Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Serial : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधील तुलसी विरानी आणि मिहिर विरानी ही जोडी प्रेक्षकांच्या आजही आठवणीत आहे. टीव्ही विश्वात ही जोडी आदर्श ठरली होती. मालिकेतील कथानकानुसार, आधी तुलसी आणि मिहिर यांच्या लग्नाला संपूर्ण विरानी कुटुंबाचा विरोध होता. तुलसी आणि मिहिरचं नातं विरानी कुटुंबाला नको होतं.

मिहिरची आई सविता तुळशीला स्वीकारायला तयार नव्हती, कारण तुळशी एक साधी, मध्यमवर्गीय मुलगी होती. सविताला आपल्या मुलासाठी श्रीमंत घरातली मुलगी हवी होती. पण शेवटी तुलसी-मिहिरचं प्रेम जिंकलं.

अशातच आता ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’च्या नव्या पर्वात आता पुन्हा तुलसी-मिहिरच्या नात्याला एक संधी दिली जात आहे. याबद्दल जुन्या आणि नव्या प्रेक्षकांनीही या जोडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तुलसी अजूनही सत्याची बाजू घेणारी आणि संस्कृत जपणारी आहे; तर मिहिरही पत्नी आणि मुलांची तो खूप काळजी घेत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

एकूणच ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका गेल्या पिढीतील लोकांबरोबरच आताच्या Gen-Z प्रेक्षकांचंही मन जिंकताना दिसत आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर या मालिकेसंबंधी तशा आनंदी प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या आहेत.

“मिहिरने तुळशीकडे पाहिलं तेव्हा एवढ्या वर्षांनंतरही त्या नजरेतलं प्रेम मनाला स्पर्शून गेलं. कितीही काळ लोटला तरी काही नात्यांची जादू कधीच कमी होत नाही”, “तुळशी आणि मिहिरची केमिस्ट्री आजही तितकीच सुंदर आहे, वय झालं तरी काही फरक पडलेला नाही. पण आता अजून अफेअर्स नकोत, कृपया यावेळी तरी दया कर”, “मिहिरने तुलसी आणि आपल्यालाही आठवण करून दिली – खरं सौंदर्य म्हणजे त्याग, शक्ती आणि प्रेम. प्रत्येक स्त्रीला असा जोडीदार मिळावा, जो तिला उभं राहायला प्रेरणा देईल.”