Lagnanantar Hoilach pream Fame Mrunal Dusanis : अभिनेत्री मृणाल दुसानीस छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. आजवर तिनं अनेक मालिकांत काम करीत तिच्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यामुळे अनेकांची ती आवडती अभिनेत्री आहे. परंतु, मृणाल फक्त प्रेक्षकांचीच नाही, तर मृणाल तिच्या कुटुंबीयांचीही आवडती आहे. नुकतंच तिच्या सासुबाई व नवऱ्यानं तिच्याबद्दल सांगितलं आहे.

गणेशोत्सवानिमित्त मृणाल दुसानीसच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यानिमित्त तिनं ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिच्यासह तिचा नवरा, मुलगी व सासुबाई असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. यावेळी तिच्या सासुबाईंना मृणाल स्क्रीनवर सून म्हणून कशी आहे हे आम्हाला माहीत आहे; पण ती खऱ्या आयुष्यात सून म्हणून कशी आहे याबद्दल विचारण्यात आलं होतं.

मृणाल दुसानिसच्या सासुबाईंनी केलं कौतुक

सुनेबद्दल विचारल्यानंतर तिच्या सासुबाई म्हणाल्या, “ती जशी स्क्रीनवर आहे, तशीच ती खऱ्या आयुष्यातही आहे. मालिकेतील नंदिनीची तिची भूमिका खूप छान आहे. ती भूमिकासुद्धा खूप छान साकारत आहे.” या मुलाखतीत मृणालच्या नवऱ्यालाही तिच्याबद्दल विचारण्यात आलं होतं. यावेळी त्याला तिची मालिकेतील भूमिका सगळ्यांना आवडते; पण तुला तिची भूमिका आवडते का?, असं विचारण्यात आलं होतं.

मृणाल दुसानिसच्या मालिकेबद्दल नवऱ्याची प्रतिक्रिया

मृणालचा नवरा म्हणाला, “नंदिनी पहिल्यापासूनच आवडत होती म्हणूनच लग्न केलं. मी तिचं काम अधूनमधून मला वेळ मिळेल तसा बघत असतो. तिचं काम ती छान करते.” यावेळी मृणालची मुलगी नुर्वीलाही तिच्या आईच्या मालिकेबद्दल विचारण्यात आलेलं. त्यावेळी नुर्वीने मृणालच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम ‘या मालिकेचं शीर्षक गीत गायलं.

मृणालनं गणेशोत्सवानिमित्त दिलेल्या मुलाखतीत तिला बाप्पाचे कोणत्या गोष्टीसाठी आभार मानशील असं विचारण्यात आलेलं. त्यावर ती म्हणाली, “मी बाप्पाचे सगळ्या गोष्टींसाठी धन्यवाद म्हणेन. खरं तर मी काही मागत नाही, मला सुचतही नाही. पण, मी नेहमी त्याचे धन्यवाद मानते आणि आज असं काहीच नाहीये,जे माझ्याकडे नाही आहे. छान घर आहे, छान कुटुंब आहे, मुलगी आहे. आता देवाच्या कृपेनं छान कामही आहे आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आणखी काय हवं. म्हणून मी कृतज्ञ आहे.”