Lagnanantar Hoilach Prem Fame Vijay Andalkar Post : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पार्थ देशमुख ही भूमिका साकारत प्रेक्षकपसंती मिळवणारा अभिनेता म्हणजे विजय आंदळकर. विजय व ज्ञानदा रामतीर्थकर यांची या मालिकेतील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. अशातच आता विजयने त्याच्या खऱ्या आयुष्यातील काव्या म्हणजेच त्याच्या बायकोसाठी पोस्ट केली आहे.

विजय आंदळकर सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यामधून तो त्याच्या मालिकेसंबंधित अपडेट्स तसेच सेटवरील पडद्यामागच्या गमतीजमती चाहत्यांसह शेअर करताना दिसतो. अशातच आता त्याने त्याची बायको अभिनेत्री रूपाली झंकारसाठी खास पोस्ट केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर बायकोसाठी ही पोस्ट शेअर करीत तिच्याबरोबरचे काही फोटोही या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

विजय आंदळकरची खऱ्या आयुष्यातील बायकोसाठी खास पोस्ट

विजयने रूपालीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करीत म्हटलं, “तुझ्याबरोबर प्रत्येक दिवस स्वप्नवत आहे जे कधीच तुटू नये, असं वाटतं. तू माझं सर्वस्व आहेस. वाढदिवसाच्या खूप शूभेच्छा.” विजयच्या पोस्टखाली रूपालीनं कमेंट करीत धन्यवाद म्हटलं आहे. तर, तिच्यासह विजयच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स करीत रूपालीला वाढदिवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रूपाली व विजय यांनी ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेतून एकत्र काम केलेलं. त्यातील त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. नंतर या दोघांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांसह लग्न करण्याचा निर्णय घेतला. विजय व रूपाली यांना आता मायरा नावाची गोड मुलगी आहे. दोघांनी २०२१ साली लग्न केलं होतं. आता त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. नुकतंच या जोडप्यानं मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं आहे.

दरम्यान, विजयच्या मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर तो यामध्ये पार्थ देशमुख ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून, यातील त्याची व ज्ञानदाची म्हणजे पार्थ आणि काव्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवड असल्याच्या त्यांच्या सोशल मीडियावरील रील्स व व्हिडीओमधून पाहायला मिळतं. त्यांच्यासह यामध्ये अभिनेत्री मृणाल दुसानीस व विवेक सांगळेही महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकत आहेत. ही मलिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.