Lagnanantar Hoilach Prem New Promo : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनी मालिकाविश्वात पुनरागमन करणार आहे. अभिनेत्री भारतात परतल्यापासून सर्वत्र तिच्या पुनरागमनाची तुफान चर्चा होती. अखेर गणेशोत्सवात मृणाल ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. डिसेंबर महिन्यात मृणालची मध्यवर्ती भूमिका असलेली ‘लग्नानंतर होईलच प्रेम!’ ही मालिका प्रक्षेपित केली जाईल. यामध्ये तिच्यासह ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हणतात. ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो तिच व्यक्ती आयुष्यभर जोडीदार म्हणून लाभायला नशीब लागतं. मात्र प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसतं. नात्यातल्या या हळुवार धाग्याची गोष्ट म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका ( Lagnanantar Hoilach Prem ).

हेही वाचा : बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”

मृणाल दुसानिस या मालिकेत नंदिनी मोहिते पाटील ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिला समाजकार्याची प्रचंड आवड असते. ज्ञानदा रामतीर्थकर या मालिकेत मृणालच्या बहिणीची म्हणजेच काव्या मोहिते पाटील ही भूमिका साकाणार आहे. अभिनेता विवेक सांगळे मिश्किल स्वभावाचं जन्नेजय हे पात्र साकारणार आहे. तसेच ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतला युवराज म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर या मालिकेत जन्मेयजच्या मोठ्या भावाची म्हणजेच पार्थ देशमुख ही भूमिका साकारणार आहे.

याशिवाय या मालिकेत अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, कश्मिरा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, प्रसन्न केतकर, संयोगिता भावे, आभा वेलणकर, विशाल कुलथे, श्रेयस कदम, स्नेहल चांदवडकर अशा अनेक दमदार कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”

हेही वाचा : “प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका”, कोकण हार्टेड गर्लचे ‘पुष्पा 2’ बद्दल स्पष्ट मत; म्हणाली, “जे चित्रपट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ( Lagnanantar Hoilach Prem ) ही मालिका येत्या १६ डिसेंबरपासून संध्याकाळी ६ वाजता प्रसारित केली जाणार आहे. ही नवीन मालिका तामिळ मालिका ‘ऐरामना रोजवे’ ( Eeramana Rojave )ची रिमेक आहे. आता या नव्या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.