‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सध्या नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय. ‘झी मराठी’ वाहिनीने नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये शत्रू तेजश्रीवर सर्वांसमोर तिच्या पोटात वाढत असलेलं बाळ त्याचं नसल्याचा आरोप करतो. अशा प्रकारे मंदिरामध्ये सर्वांसमोर तो तेजश्रीवर आरोप करीत संशय घेतो. त्यामुळे सूर्या व त्याच्यामध्ये वाद होताना पाहायला मिळते.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूर्या शत्रूला “हा काय तमाशा लावला आहे तुम्ही. माझ्या बहिणीची तब्येत नाजूक आहे आणि तिच्या पोटात तुमचं बाळ आहे”, असं म्हणतो. त्यावर शत्रू “हे बाळ माझं आहे की कोणाचं पाप आहे तेच सिद्ध करायला चाललो आहे”, असं म्हणतो. शत्रूच्या तोंडून हे ऐकल्यानंतर सूर्या भडकतो. पुढे शत्रूचे वडील येतात आणि त्याला शांत व्हायला सांगतात परंतु, शत्रू त्यांना, “डॅडी याची बहीण वाईट चालीची आहे; तर माझ्याकडे याचे पुरावे आहेत”, असं सांगतो. पुढे तेजू तीच्यवर झालेलं आरोप खोटे असल्याने ते सिद्धा करण्यासाठी सूर्याला, “दादा, मी ही परीक्षा देणार”, असं म्हणते. त्यावर सूर्या, “तू परीक्षा द्यायला तयार झालीस, तर तुझ्या नवऱ्यालाही द्यावी लागेल”, असं सांगतो.

प्रोमोमध्ये पुढे तेजू व शत्रू कठीण परीक्षा देताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे सूर्या बहिणीसाठी मंदिरात तांडव करताना दिसतो. त्यामुळे शत्रूने तेजूवर केलेल्या आरोपांनंतर पुढे मालिकेत काय घडेल हे पाहणं रंजक ठरेल. तेजू व शत्रू ही पर्डीची देण्यात यशस्वी होतील का? तेजूच्या पोटात असलेलं बाळ त्याचंच असल्याचं शत्रू मान्य करेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागात पाहायला मिळतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असतात. चार बहिणींचा एकुलता एक भाऊ सूर्याचं त्याच्या बहिणींवर प्रचंड प्रेम असल्याचं पाहायला मिळतं. नेहमी त्याच्या बहिणींसाठी तो त्यांच्यामागे ठामपणे उभा असतो. तसेच सध्या तुळजा व सूर्या यांच्यामध्ये जवळीक वाढत असून, त्यांचं नातं बहरताना दिसत आहे.