Lakhat Ek Aamcha Dada Upcoming Twist: ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील सूर्यादादा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतो. त्याच्या कुटुंबावर त्याचे खूप प्रेम आहे. बहि‍णींवर त्याचे जीवापाड प्रेम आहे आणि त्यांच्या रक्षणासाठी तो काहीही करू शकतो, हे वेळोवेळी पाहायला मिळते.

त्याबरोबरच तो गावकऱ्यांच्या मदतीलाही वेळोवेळी धावून जातो. त्यामुळे गावातील लोक त्याला मान-सन्मान देतात आणि त्याच्याही मदतीला धावून येतात. तसेच, काही समस्या असतील तरी त्याच्याशी चर्चा करतात.

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत काय घडणार?

आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूर्या गावकऱ्यांसाठी पुन्हा एकदा डॅडी ऊर्फ जालिंधरविरुद्ध जाणार असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने लाखात एक आमचा दादा या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, गावातील एक महिला सूर्याच्या दुकानात येते. त्याच्या दुकानातून अंडी विकत मागते. त्यावर सूर्याला आश्चर्य वाटते. तो तिला विचारतो की, तुमच्या घरात कोंबड्या आहेत ना? त्यावर ती महिला त्याला सांगते की, डॅडींनी पोल्ट्रीवर कब्जा केलाय.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, जालिंधरच्या घरासमोर काही गावकरी जमले आहेत. जालिंधरसमोर गावकरी बसले आहेत. जालिंधर विचारतो की, तुमच्या काय तक्रारी आहेत? एक गावकरी सांगतो की, एकाने माझ्या शेतातील माती चोरली. एक महिला सांगते की, माझ्या पोल्ट्रीवर कब्जा केलाय. आणखी एक गावकरी सांगतो की, कर्जाच्या नावाखाली माझी जमीन गहाण ठेवून घेतली आहे. त्यावर जालिंधर म्हणतो की, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ.

त्यावर तिथे बसलेला एक माणूस म्हणतो की, हे सगळं करणारा एकच माणूस आहे. जालिंधर म्हणतो त्याला घेऊन या. कोण आहे तो? तितक्यात सूर्या त्याच्या मित्रांसह तिथे येतो. येताना तो शिट्टी वाजवतो. त्याला पाहून जालिंधर म्हणतो की, बोला, घाबरू नका. गावकरी म्हणतात की, डॅडी, तो माणूस तुम्हीच आहात. गुन्हेगार तर तुम्हीच आहात म्हटल्यावर आमचा न्याय कोण करणार?

तितक्यात एक गावकरी म्हणतो की, एकच माणूस आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो आणि तो म्हणजे सूर्या आहे. हा प्रोमो शेअर करताना सूर्या गावकऱ्यांना न्याय मिळवून देईल? अशी कॅप्शन दिली गेली आहे.

काही दिवसांपूर्वीच तेजूला दोन्ही मुली झाल्यानंतर जालिंधरने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सूर्याने त्याच्या बहिणीला मान-सन्मानाने घरी परत आणले. त्याबरोबरच त्याने जालिंधरला तुरुंगातही पाठवले होते. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.