Lakhat Ek Amcha Aada fame actors dance video: सोशल मीडियावरील विविध रील्स, व्हिडीओ, फोटो अशा अनेक गोष्टी लक्ष वेधून घेत असतात. कधी एखादी डान्स स्टेप ट्रेंड होते तर कधी गाण्याच्या दोन ओळी प्रत्येक व्हिडीओला ऐकायला मिळतात. कलाकारही सोशल मीडियावरचे हे ट्रेंड फॉलो करताना दिसतात.
अनेक कलाकार सोशल मीडियावर विविध ट्रेंडवर व्हिडीओ, रील्स शेअर करताना दिसतात. आता लाखात एक आमचा दादा मालिकेतील अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक रील शेअर केली आहे. अभिनेत्री समृद्धी साळवीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
‘लाखात एक आमचा दादा’मधील कलाकारांनी धरला ठेका
या व्हिडीओमध्ये कलाकार ‘जुती मेरी’ या गाण्यातील ठुमक ठुमक या ओळींवर डान्स स्टेप करताना दिसत आहेत. यामध्ये नितीश चव्हाण, जुई तानपुरे, ईशा संजय, महेश जाधव, अतुल कुडाळे, स्वप्नील कणसे तसेच जालिंधरच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते गिरीश ओक याबरोबरच सेटवरील इतर मंडळी या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, ही रील माझ्या कायम आठवणीत राहणार आहे. तसेच तिने मालिकेतील इतर नितीश, ईशा, जुई यांच्यासह इतर कलाकारांनादेखील टॅग केले आहे.
नेटकरी काय म्हणाले?
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत, तर काहींनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. नेटकऱ्यांनी लिहिले, “आम्हाला डॅडींना पुन्हा बघायचे आहे”, “डॅडी, आम्हाला ओक सरांचे आणखी व्हिडीओ पाहायचे आहेत”, “हे भारी आहे”, “क्यूट”, असे लिहित नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.


मालिकेत या कलाकारांची पात्रे एकमेकांच्या विरोधात असलेली दिसतात. मात्र, ऑफ स्क्रीन त्यांच्यातील बॉण्डिंग घट्ट असल्याचे पाहायला मिळते. हे कलाकार अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच, एखादा सीन शूट करताना नेमकं काय घडते, याचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर दिसतात, त्यामुळे पडद्यामागच्या गमतीजमती लोकांना पाहायला मिळतात.
दरम्यान, लाखात एक आमचा दादा मालिकेत सध्या डॅडी व सूर्या एकमेकांविरोधात उभे असल्याचे दिसत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.