Lakshmi Niwas and Paaru upcoming twist: सध्या ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘पारू’ या मालिकांचा महासंगम सुरू असल्याचे दिसत आहे. अनेक दिवसांनी दोन्ही कुटुंबे एकत्र आल्याचे दिसत आहे. दोन्ही मालिकांत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
अहिल्या व लक्ष्मी या जुन्या मैत्रिणी आहेत. जुन्या कॉलेजच्या आठवणी, गैरसमज, मैत्री आणि मंगळागौरी स्पर्धा या महासंगममध्ये पाहायला मिळत आहेत. अशातच त्यांची जुनी वर्गमैत्रीण पद्मावती घोरपडे पुन्हा त्यांच्या आयुष्यात आल्याचे पाहायला मिळाले. कॉलेजमध्ये असताना लक्ष्मी आणि अहिल्याने तिची थट्टा केली होती. त्या गोष्टीचा राग आजही पद्मावतीच्या मनात असल्याचे पाहायला मिळते.
महासंगममध्ये पुढे काय होणार?
आता या वर्गमैत्रिणींची पुन्हा भेट झाल्यानंतर त्या रागात पद्मावतीने लक्ष्मी व अहिल्याला मंगळागौरीच्या स्पर्धेचे चॅलेंज दिले आहे. पद्मावतीने लक्ष्मीचे भाड्याचे घर विकत घेऊन, तिला घराबाहेर काढायची धमकी दिल्यानंतर अहिल्या व लक्ष्मीने हे चॅलेंज स्वीकारले आहे.
एकीकडे अहिल्या व लक्ष्मी पद्मावतीने दिलेले चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असताना दिशा पद्मावतीला सावध करीत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘पारू’ या मालिकांच्या महासंगमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, दोन्ही कुटुंबे देवासमोर हात जोडून उभी आहेत. लक्ष्मी म्हणते की, ही लढाई जिंकण्याची शक्ती दे. कोणीतरी नारळ फोडते आणि तो नारळ खराब निघतो. ते पाहिल्यानंतर दामिनी म्हणते की, हा तर अपशकुन झाला. त्यावर श्रीनिवास म्हणतो की, आपल्यासाठी अपशकुन खरं तर पद्मावती आहे.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, दिशा आणि पद्मावती फोनवर बोलत आहेत. दिशा म्हणते पद्मावतीला म्हणते की, इतकं सगळं होऊनही आम्ही घराबाहेर पडतच आहोत. पद्मावती म्हणते की घराबाहेर पडलात आणि खेळलात म्हणजे त्याचा अर्थ जिंकलात, असा होत नाही. दिशा म्हणते की तुम्ही सगळ्यांना हलक्यात घेऊ नका. तू बघ कसा चक्कीत जाळ काढते ही पद्मावती. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, पद्मावतीविरोधातील लढाई कशी जिंकणार लक्ष्मी आणि अहिल्या? अशी कॅप्शन दिली आहे.
आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.