Laxmichya Pavalani Fame Isha Keskar Praises Jui Gadkari : जुई गडकरी मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहोत. ती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जुईचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. पण फक्त प्रेक्षकच नव्हे, तर जुईचे सहकलाकारही तिचं खूप कौतुक करत असतात. अशातच ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्री ईशा केसकरनंही जुई गडकरीचं कौतुक केलं आहे.

जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत मुख्य नायिकेचं पात्र साकारत आहे; तर ईशा ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत कला हे पात्र साकारत आहे. अशातच आता दहीहंडीनिमित्त या मालिकांमधील कलाकार एकत्र येणार असून, प्रेक्षकांसाठी दहीहंडीनिमित्त या मालिकांमध्ये खास भाग पाहायला मिळणार आहेत. त्याबद्दल ईशा व जुईनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

जुई व ईशानं नुकतीच ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मालिकांबद्दल तसेच त्यांच्या ऑफस्क्रीन बाँडबद्दल सांगितलं आहे. त्यांना तुम्हा दोघींना एकमेकींबद्दल काय आवडलं असं विचारण्यात आलेलं. त्यावर जुई ईशाबद्दल सांगताना म्हणाली, “स्पष्टवक्तेपणा. तिला फिल्टरच नाहीये काही. मला तसंच आवडतं. मीसुद्धा तशी आहे. मी असं काही फार मनात ठेवून नाही राहू शकत, मग मला काहीतरी व्हायला लागतं.”

ईशा केसकरने केलं जुई गडकरीचं कौतुक

जुई पुढे म्हणाली, “मलाही तसंच आवडतं माझं असं म्हणणं आहे की, बोला ना जसे आहात तसे वागा ना कशाला, तुम्हाला काहीतरी एक वेगळं फिल्टर घेऊन वागायचं आहे. मी तशी आहे त्यामुळे मला तशी माणसं आवडतात.” ईशी पुढे म्हणाली, “मला संयमी लोक आवडतात. कारण- मला असं वाटतं की, एकमेकांबरोबर काम करताना बऱ्याचदा खटके उडतातच. पण मला तिचा अप्रोच आवडतो. ती खूप संयमी आहे.”

ईशा पुढे म्हणाली, “जुई तिच्या टीममधील लोकांबरोबर खूप संयमाने वागते. मी जर तिच्या जागी असते, आणि मला काही गैर वाटलं असतं, तर मी तिनं सांगितलं तसं स्पष्टपणे बोलले असते; पण माझा फटकळपणाही आहे, जो माझ्यासाठी काही वेळा फायद्याचा ठरत नाही. मी चिडले, तर लगेच तसं दाखवणार लगेच विरोध करणार. तिचं तसं नाहीये आणि मला तिच्याबद्दल ही गोष्ट खूप आवडते. मला आवडलं असतं, जर असा गुण माझ्यातही असता तर.”