‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून सुप्रसिद्ध विनोदी कलाकार अरुण कदम काही दिवसांपूर्वीच आजोबा झाले आहे. अरुण कदम यांची लेक सुकन्या कदमने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नुकतंच अरुण कदम यांच्या नातवाचं बारसं मोठ्या थाटात पार पडले.

अरुण कदम यांची लेक सुकन्याने १९ ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. त्याच्या जन्मानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर केले होते. आता मोठ्या थाटामाटात त्याचा नामकरण सोहळा पार पडला. याचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा : …म्हणून वनिता खरातने किर्ती कॉलेजला घेतलेला प्रवेश, समीर चौघुलेंनी केली पोलखोल

सुकन्या कदम आणि सागर पोवाळे यांनी त्यांच्या बाळाचे नाव अथांग असे ठेवले आहे. तर त्याचे पाळण्यातील नाव माधव असे आहे. अथांग या नावाचा अर्थ अगणित, व्यापक असा होतो. समुद्राला किंवा आकाशाला हे विशेषण दिले जाते.

sukanya kadam
सुकन्या कदमच्या बाळाचे नाव

आणखी वाचा : “लक्ष्या काकांचा तो वारसा मी चालवला”, आदिनाथ कोठारेने सांगितली खास आठवण, म्हणाला “ते सेटवर आले की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अरुण कदम यांची लेक कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आहे. शिवाय ती भरतनाट्यमही शिकली आहे. तिचे आणि सागरचे लग्न २०२१ मध्ये झाले. त्यानंतर आता २०२३ मध्ये त्यांनी पहिल्या बाळाचे स्वागत केले.