छोट्या पडद्यावरुन महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल बने आणि अभिनेत्री स्नेहल शिदम सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी स्नेहलने तिच्या सोशल मीडियावरुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेबरोबरचा एक गोड फोटो शेअर केला होता. या फोटोने आणि त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या फोटोमुळे ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चाही रंगली आहे. पण आता मात्र निखिल बनने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. तो सध्या पोस्ट ऑफीस उघडं आहे या मालिकेत झळकताना दिसत आहे. नुकतंच निखिलने Its Majja या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने स्नेहलबरोबर काढलेल्या त्या फोटोबद्दल भाष्य केले.

निखिल बनेची पहिली प्रतिक्रिया

“सध्या मला त्या चर्चांवर काहीही बोलायचं नाही. पण मला सध्या खूप छान वाटतंय, कारण आम्ही दोघंही सध्या ट्रेंडमध्ये आहोत. आम्ही कॉलेजपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आम्ही नाटकांपासून एकत्र काम करतोय. आम्ही खूप दिवसांनी भेटलो की अनेकदा एकत्र फोटो काढतो. त्यादिवशी वनिताच्या लग्नात आम्ही भेटलो. चांगला कॅमेरा होता, म्हणून फोटो काढला.

माझा कधी नव्हे ते त्या दिवशी आयुष्यात एक बरा फोटो आला आणि तो अपलोड केला तर त्यावरुन इतक्या बातम्या झाल्या. याच्या इतक्या बातम्या होतील असं मला वाटलं नव्हतं. पण ठिक आहे, मला आवडतंय की लोकांच्या आपण इतके मनात आहोत. त्यामुळे तुम्ही हव्या तितक्या बातम्या करा. आम्हाला काहीही हरकत नाही. आम्ही एकमेकांचे मित्र आहोत आणि तसेच कायम राहू”, असे निखिल बने म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Snehal Shidam (@snehalshidam)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान निखिल बने व स्नेहल शिदमने अभिनेत्री वनिता खरातच्या लग्नात हजेरी लावली होती. लग्नसोहळ्यातील हा फोटो त्यांनी शेअर केला आहे. यावेळी ते दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे आहेत. त्यावेळी स्नेहल ही लाजताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोला तिने “पिरतीच्या फडात गं…धरला हात असा…काळीज येंधलं आरल …” असं कॅप्शन दिलं होतं. या फोटोमुळे स्नेहल व निखिल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.