‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम केवळ देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या कार्यक्रमामुळे वनिता खरात, गौरव मोरे, सुमीर चौघुले, प्रियदर्शिनी इंदलकर, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, शिवाली परब यांसारखे असंख्य कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. यापैकी एक अभिनेता म्हणजे दत्तू मोरे. नुकताच दत्तूने त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

दत्तू मोरेने २३ मे २०२३ रोजी गुपचूप लग्नगाठ बांधत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. त्यानंतर स्वाती आणि दत्तूने त्यांच्या लग्नाचं खास रिसेप्शन ठेवलं होतं. या समारंभाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील बरेच कलाकार उपस्थित राहिले होते. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दत्तूच्या पत्नीने त्याला भेट म्हणून नवीकोरी बाईक गिफ्ट म्हणून दिली आहे.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्याने रोमँटिक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “गिफ्ट लवकरच…?” असं लिहिलं होतं. यावरून अभिनेत्याला नेमकं काय गिफ्ट मिळणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. यानंतर काही वेळात दत्तूने नवीन गाडी घेतल्याची आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली.

हेही वाचा : Video : “किसी डिस्को में…”, गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर गौरव मोरेचा जबरदस्त डान्स, जोडीला होती ‘ही’ मराठी अभिनेत्री

दत्तूने या नव्या बाईकबरोबरचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला अभिनेत्याने “लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट…खूप खूप थँक्यू बायको” असं कॅप्शन दिलं असून, यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत दत्तूवर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, यात एक कमेंट लक्षवेधी ठरली.

हेही वाचा : “आडनावावर, घरच्यांवर जाण्याची गरज नाही”, आस्ताद काळे ट्रोलिंगबद्दल स्पष्टच बोलला; म्हणाला, “सभ्य भाषेत…”

एका नेटकऱ्याने दत्तूने नवीन गाडी घेतल्याच्या व्हिडीओवर “भाऊ राग नका येऊ देऊ पण, तुमचे पाय पुरतात का त्या गाडीवर…अभिनंदन” अशी कमेंट केली होती. अभिनेत्याने या व्हिडीओवर “हो म्हणूनच घेतली ही गाडी” असं अगदी मजेशीर उत्तर देत सर्वांचं मन जिंकून घेतलं.

हेही वाचा : आजारपणानंतरही IPL च्या अंतिम सामन्याला उपस्थित राहणार शाहरुख खान! आर्यन-सुहानासह सगळेच मित्रमंडळी निघाले चेन्नईला

dattu more
दत्तू मोरेचं नेटकऱ्याला उत्तर

हेही वाचा : Video : नारकर जोडप्याला पडली मल्याळम भक्तिगीताची भुरळ, जबरदस्त हावभाव पाहून नेटकरी म्हणाले, “तुमचे रील्स…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दत्तूने शेअर केलेल्या या व्हिडीओवर त्याचे चाहते व नेटकऱ्यांसह अभिनेत्री वनिता खरात, अभिनेता निखिल बने यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.