लेक आणि जावयाच्या खास कौतुकाचा महिना म्हणजे अधिक मास. दर तीन वर्षांनी येणार हा महिना पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. या महिन्यात लेकीला जावयाला घरी बोलवले जाते, त्याला गोडा-धोडाचं जेवण दिलं जातं. त्याचा मानपान करत त्याला सोनं किंवा चांदीची वस्तू देण्याची पद्धत आहे. याच अधिकमासाच्या निमित्ताने अभिनेते अरुण कदम यांच्या पत्नीने लेक आणि जावयाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा दादूस म्हणजेच अरुण कदम. या कार्यक्रमात ते साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना अगदी लक्षात राहणारं असतं. त्यांची मंचावर एण्ट्री होताच टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. नुकतंच अरुण कदम यांच्या पत्नीने लेक आणि जावयाच्या अधिकमास निमित्ताने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने मोडला ‘वेड’चा रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले इतके कोटी

या व्हिडीओत ते सहकुटुंब एका हॉटेलमध्ये जेवायला आल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर त्या जावयाचे कोडकौतुक करताना दिसत आहे. तसेच त्यांनी जावयाचा मानपान करत त्याला चांदीची भेटवस्तू दिली. तसेच त्यांनी लेकीलाही भेटवस्तू दिल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर त्यांनी कुटुंबातील इतर व्यक्तींनाही विविध भेटवस्तू भेट म्हणून दिल्या. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी ‘अधिक मास स्पेशल’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ नाकारणाऱ्या निर्मात्याने केदार शिंदेना केला मेसेज, म्हणाला “माझी बस चुकली, पण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैशाली कदम यांच्या या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ‘ताई खूप छान’, ‘खूप मस्त’, असे अनेकांनी म्हटले आहे.