‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार नेहमी चर्चेत असतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता प्रसाद खांडेकर. अलीकडेच प्रसादने त्याच्या नव्या नाटकाची घोषणा केली. ‘थेट तुमच्या घरातून’ असं त्याच्या नव्या नाटकाचं नाव आहे. या नाटकाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसादने सांभाळली आहे. ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात प्रसादबरोबर अभिनेत्री शिवाली परब, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेरावर पाहायला मिळणार आहेत. २१ डिसेंबरला या नव्या नाटकाचा शुभारंभ प्रयोग होणार आहे. अशातच प्रसादने सोशल मीडियावर नुकतीच लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने बायकोसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता प्रसाद खांडेकरने बायको अल्पा खांडेकरबरोबर फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको…बस तू आहेस बरोबर म्हणून तुझ्या साथीने एक एक टप्पा पार करतोय…अजून खुप टप्पे पार करायचेत…जसं प्रोत्साहन देत पुढे ढकलतेस तसंच प्रसंगी घट्ट पाय रोवून ठेहराव पण घ्यायला लावतेयस…प्रेमाची ९ वर्ष आणि लग्नाची ११ वर्ष…एकूण २० वर्ष कशी गेलीत कळलं नाही,” असं लिहित प्रसादने बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत. पण लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने दोघांनी एकमेकांना काय गिफ्ट दिलं? जाणून घ्या…

हेही वाचा – अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…

हेही वाचा – अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”

बायकोसाठी खास पोस्ट केल्यानंतर प्रसादने गिफ्टचा फोटो शेअर केला. प्रसादने बायकोला लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने लॅपटॉप गिफ्ट केला आहे. तर रिटर्न गिफ्ट म्हणून अल्पाने अभिनेत्याला खास दागिना दिला आहे.

हेही वाचा – “मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…

हेही वाचा – “तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसाद खांडेकरची बायको काय करते?

प्रसाद खांडेकरची बायको अल्पा खांडेकर स्वतःचा व्यवसाय करते. स्वीट मेमरीज (Sweet memories) असं तिच्या व्यवसायाचं नाव आहे. ‘स्वीट मेमरीज’च्या माध्यमातून अल्पा केक, चॉकलेटचा व्यवसाय करते. प्रसाद सोशल मीडियावर नेहमी अल्पाबरोबर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.