‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम म्हणून कायमच चर्चेत असतो. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून रोहित माने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ‘सावत्या’ या नावाने तो सर्वत्र प्रसिद्ध झाला. नुकतंच रोहित मानेने एका मुलाखतीत शेती करण्याबद्दल भाष्य केले आहे.

रोहित माने हा त्याच्या सहज आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाला. रोहितने नुकतंच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला अभिनेता नसता तर काय केलं असतं? असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
आणखी वाचा : “ओंकार भोजने आणि तुझं नातं काय?” कोकण हार्टेड गर्ल म्हणाली, “आम्ही एकमेकांचे…”

“मी अभिनेता नसतो तर गावाला शेती करत असतो. कारण माझे कुटुंब मी ११-१२ वीत असताना गावी स्थायिक झाले. त्यांनी मी त्यांच्याबरोबर गावी यावं यासाठी खूप प्रयत्न केले. आपण गावी जायचं, तिथे जाऊन शेती करायची आणि निवांत राहायचं. पण मला अभिनेताच व्हायचं होतं’, असे रोहितने म्हटले.

“त्यामुळे मग मी मुंबईत एकटा राहिलो. त्यानंतर मग अभिनय क्षेत्रात उतरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मग मी जर अभिनेता नसतो तर गावी शेती करत असतो”, असेही तो म्हणाला.

आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रोहित मानेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे त्याला ‘सातारचा विनोदीतारा’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखू लागला आहे. रोहितनं राजन खान यांच्या कथेवरील ‘एकूट समूह’ या एकांकिकेतून पहिल्यांदा प्रमुख भूमिका केली. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिकही मिळालं.