छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचली गुणी अभिनेत्री म्हणजे कल्याणची चुलबली शिवाली परब. हास्यजत्रेत शिवाली तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवते. आता शिवाली नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिवालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ असं तिच्या नव्या मालिकेचं नाव आहे. सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. एक प्रोमो व्हिडीओ शिवालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

हेही वाचा>> “अक्कलकोटला गेल्यानंतर मला पहिल्यांदा…” ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ अनुभव

हेही वाचा>>Video: अक्षया-हार्दिकच्या लग्नानंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणादा-पाठकबाईंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

शिवालीने या पोस्टला “लवकरच…अवघ्या महाराष्ट्राला पाठवत आहोत हास्याची मनी ॲार्डर…नवी मालिका -‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…..’ लवकरच… सोनी मराठी वाहिनीवर…” असं कॅप्शन दिलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नंतर शिवाली पुन्हा एकदा नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पोट धरुन हसवण्यासाठी व त्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

हेही वाचा>> बेडवरील फोटो शेअर केल्यामुळे ‘तारक मेहता’ फेम प्रिया अहुजा ट्रोल; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकांबरोबरच शिवालीने मराठी चित्रपटातही काम केलं आहे. तिचा ‘प्रेम, प्रथा, धुमशान’ हा चित्रपट गेल्याच महिन्यात सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात बोल्ड सीन दिल्यामुळे शिवाली चर्चेत आली होती.