मराठी मनोरंजनसृष्टीत अभिनेते अरुण कदम यांनी आपल्या विनोदी शैलीनं वेगळी छाप उमटवली आहे. लाडका दादूस म्हणून त्यांना ओळखलं जातं. सध्या ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. अशातच एक दादूसचा जुना फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – “अबाया परिधान केल्याने कोणी मुस्लिम होत नाही…” गौहर खानने नाव न घेता राखी सावंतवर केली टीका, म्हणाली…

अभिनेते अरुण कदम यांनी नुकताच एक जुना फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. या फोटोमागची गोष्ट देखील त्यांनी सांगितली आहे. या फोटोमध्ये अरुण कदम जुन्या काळातला फोन कानाला लावून बसलेले पाहायला मिळत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहीलं आहे की, “हा फोन ज्या सालात आला होता त्या सालातला हा फोटो आहे. शिवाजी मंदिरच्या समोर प्रकाश फोटोग्राफर होते. त्यांनी हा फोटो काढला होता.”

हेही वाचा – ‘वाळवी’नंतर पुन्हा एकदा स्वप्नील जोशी आणि शिवानी सुर्वे झळकणार ‘या’ चित्रपटात; अभिनेत्रीने शेअर केली पहिली झलक

हेही वाचा – “मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार…” ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदेची भावुक पोस्ट; म्हणाली, “पुन्हा नव्या रुपात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दादूसच्या या जुन्या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहतीनं लिहीलं आहे की, “मी तुम्हाला ऐकू शकते. तुम्ही बोला, ऐ वसाऱ्या.” तर दुसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, “जाम भारी म्हणजे जामच भारी.” तसेच तिसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, “जुनं ते सोनं.”

हेही वाचा – “‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकात एन्ट्री होताच प्रेक्षक भुवनेश्वरी, भुवनेश्वरी ओरडू लागले अन्…”; कविता मेढेकर सांगितला किस्सा, म्हणाल्या…

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अरुण कदम आजोबा झाले. त्यांच्या मुलीला म्हणजेच सुकन्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. या गोंडस बाळाबरोबरचे अरुण कदम यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.