‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे ( Gaurav More ) सध्या हिंदी सिनेसृष्टीतही चांगलाच सक्रिय झाला आहे. लवकरच गौरव ‘संगी’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात गौरवसह अभिनेता शरीब हाश्मी, संजय बिश्नोई, विद्या मालवडे पाहायला मिळणार आहे. अशातच गौरवची अचानक भेट प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्याबरोबर झाली. या अचानक भेटीचा फोटो गौरवने इन्टाग्रामवर शेअर केला आहे.

लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदेशाहीचा महाराष्ट्रातच नाही तर देशभरात चाहता वर्ग आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आज शिंदे घराण्याची चौथी पिढी जिवंत ठेवून आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत उल्लेखनीय आणि वाखण्याजोग असं योगदान शिंदेशाहीचं आहे. अशा या शिंदेशाही घराण्यातील आनंद शिंदेंची भेट गौरव मोरेशी झाली.

हेही वाचा – Video: “जय बजरंगबली…”, ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

गौरव मोरे आनंद शिंदेंबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला, “माझं बालपण ज्यांच्या आवाजाने मोठं झालं, अजूनही त्यांचा आवाज, त्यांची गाणी ऐकतो असे माझे आणि संपूर्ण भारताचे आवडते गायक आनंद शिंदे साहेब…यांची अचानक झालेली भेट आणि फोटोचा मोह आवरता नाही आला…साहेब तुमचा आशीर्वाद असू द्या.” गौरव आणि आनंद शिंदेंच्या अचानक भेटीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: सिद्धार्थ जाधव लवकरच येतोय धिंगाणा घालायला; ‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व कधीपासून सुरू होणार जाणून घ्या…

Gaurav More Instagram Story
Gaurav More Instagram Story

हेही वाचा – “विषय लीलया पेलला”, ‘पाणी’ चित्रपटावर प्रतिक्रिया देताना महेश मांजरेकरांनी आदिनाथ कोठारेचं केलं कौतुक अन् आजकालच्या अभिनेत्रींना दिला सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरव मोरेचं ‘हे’ स्वप्न झालं पूर्ण

दरम्यान, ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ असं म्हणत घराघरात पोहोचलेल्या गौरवचं अलीकडेच एक स्वप्न पूर्ण झालं. ते म्हणजे गौरवला स्वतःच्या हक्काचं घर मिळालं. मुंबई म्हाडा लॉटरीमध्ये गौरवला घर लागलं. त्याने पवई येथील घरासाठी म्हाडा लॉटरीचा अर्ज भरला होता. म्हाडाच्या एचआयजी श्रेणीतून गौरवने अर्ज केला होता. या उच्च श्रेणीतील घरांची किंमत जवळपास १ कोटी ७८ लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे गौरवला म्हाडाकडून लागलेल्या घराची किंमतही इतकीच असल्याचं म्हटलं जात आहे.