‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अनेक विनोदी कलाकार सातत्याने चर्चेत असतात. या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. इतकंच नव्हे तर त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात. तिने नाटकांपासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. वनिताने मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली.

वनिता खरातने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट केले आहे. यात वनिताने निळ्या रंगाची पैठणी साडी परिधान केली आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “तू लग्नात कोणता उखाणा घेतला होतास?” सखी गोखलेला विचारलेल्या प्रश्नावर सुव्रत जोशी म्हणाला, “तिने…”

“गणेशोत्सवानिमित्त मी हि पैठणी साडी नेसले होते. ही साडी मला आमचे लाडके अरुण काका यांनी लग्नाची भेट म्हणून दिली होती. अरुण काका love you. खूपच सुंदर साडी आहे हि. साडीप्रेम वाढतचं चाललय”, असे कॅप्शन वनिता खरातने दिले आहे.

आणखी वाचा : “मला नाही आवडत ते…”, ‘ताली’ पाहिल्यानंतर सखी गोखलेने सुव्रतला दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणाली “आजूबाजूला स्त्रिया…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान वनिता खरातच्या या पोस्टवर तिचा पती सुमित लोंढेने कमेंट केली आहे. त्याने या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत. त्यावर वनिताने किस करतानाचे इमोजी पोस्ट केले आहे. तसेच या पोस्टवर नम्रता संभेरावने “माझा गोडुला” अशी कमेंट केली आहे.