छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवर्जुन पाहिला जातो. या शोचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेतील कलाकार प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. कित्येक विनोदवीरांना हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली. अभिनेता निखिल बनेही हास्यजत्रेमुळे घराघरात पोहोचला. विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा निखिल बने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच निखिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. निखिलने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेले दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हेही वाचा>> “त्यांना महात्मा गांधींच्या…”, एकेरी उल्लेख करत शरद पोंक्षेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले, “वीर सावरकर अन्…” हेही वाचा>> Big Bang Theory: माधुरी दीक्षितला “वेश्या” म्हणणाऱ्या अभिनेत्याला जया बच्चन यांनी सुनावलं, म्हणाल्या “त्याला..” निखिल बनेने या फोटोला "अशोक मामांना भेटणं आणि त्यांना प्रत्यक्ष पाहणं हा एक अविस्मणीय क्षण होता माझ्यासाठी", असं कॅप्शन देत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. अशोक सराफ यांच्यासाठी केलेल्या निखिल बनेच्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. निखिल बनेच्या या पोस्टवर चाहत्यानी कमेंटही केल्या आहेत.