‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. या शोमधील सर्व कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवत असतात. याच शोमधील प्रेक्षकांचा आवडता अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप होय. पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. ही पोस्ट त्याच्या स्वप्नपूर्तीबद्दल आहे.
पृथ्वीक प्रतापने स्वतःचं घर घेतलं आहे. घर घेण्याचं त्याचं स्वप्न खूप कमी काळात पूर्ण झालं. याबद्दल त्याने नवीन पोस्टमध्ये माहिती दिली आहे. स्वप्नांपासून… सत्यापर्यंत..!
आजपासून ६ महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये माझं एक स्वप्न मी जगासमोर बोलून दाखवलं.. तेव्हा कल्पनाही नव्हती की अगदी सहा महिन्यात universe माझ्या प्रयत्नांना योग्य वाट दाखवेल… आज आईला आणि जाईला स्वतःच्या घरात खुश पाहून भरुन पावलोय.
तरीही अजून Penthouse आणि Queen’s Throne बाकी आहे. पण साला हार नाही मानणार… कारण मध्यमवर्गीयांची स्वप्न आणि त्यांच्या शर्यती, फक्त बघण्यासाठी नाही तर पूर्ण करण्यासाठी असतात, असं कॅप्शन देत पृथ्वीकने आई व जाईचे नवीन घरातील फोटो शेअर केले आहेत.
पृथ्वीकच्या या पोस्टवर कमेंट्स करून मराठी अभिनय क्षेत्रातील मंडळी व चाहते शुभेच्छा देत आहेत. प्रथमेश परब, वनिता खरात, अभिषेक रहाळकर यांनी पृथ्वीकला हक्काच्या नवीन घराचं स्वप्न पूर्ण झालं, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून वेगळी झाली मराठमोळी अभिनेत्री, पण घटस्फोट घेणार नाही; कारण…
दरम्यान, पृथ्वीक शाहरुख खानचा मोठा चाहता आहे. त्याचा आवडता अभिनेता शाहरुख खानच्या वाढदिवशी म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी म्हाडाचं घर पृथ्वीकच्या नावावर झालं होतं, अशी आनंदाची बातमी त्याने पोस्ट करत दिली होती.