छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ओळखले जाते. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. प्रियदर्शनी नुकतीच एक नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ती ही आनंदाची बातमी दिली आहे.
हेही वाचा- “तू लग्न कधी करत आहेस?” अखेर प्राजक्ता गायकवाडने दिलं उत्तर, म्हणाली…
प्रियदर्शनीने आपल्या नव्या गाडीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रियदर्शनीने मारुती सुझुकी कंपीनीची इग्निस गाडी घरी आणली आहे. कारचे फोटो शेअर करत प्रियदर्शनीने लिहिलं , माझ्या कुटुंबात नवीन सदस्य आला आहे. वाढदिवसाला अनेकांनी विश केलं, “तुझी स्वप्न पूर्ण होवोत” त्या सर्वांना ‘Thank you’ !आणि माझ्यासोबत माझ्या आनंदात नाचणाऱ्या सर्वांचेही तितकेच अभिनंदन ! या सगळ्या फोटोंमध्ये आनंद ओसांडुन वाहतोय पण Number 7 … IS THE WINNER !
प्रियदर्शनीच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत तिचं अभिनंदन करत आहेत. अभिनेता पृथ्वीक प्रतापनेही या पोस्टवर कमेंट केली आहे. पृथ्वीकने कमेंटमध्ये लिहिलं आहे. ‘ए बजोओ. थोडा गोरेगावपर्यंत ड्रॉप करशील का?’ अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर वनिता खरातनेही ‘यो माय गर्ल’ अशी कमेंट केली आहे.