‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम. अल्पावधीतच या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमातून अनेक हास्यवीर प्रसिद्धीझोतात आले. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात. आपल्या अभिनयाच्या जोरावर वनिताने मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. वनिताचा चाहतावर्गही मोठा आहे.

सोशल मीडियावर वनिता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. वनिताप्रमाणेच तिचा पती सुमित लोंढेही चांगलाच चर्चेत असतो. दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीम सिंगापूर दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यावर हास्यजत्राचे कलाकार आपल्या कुटुंबीयांना घेऊन गेले होते. वनिता खरातबरोबर सुमित लोंढेही या ट्रीपला गेला होता. सुमितने या ट्रीपदरम्यानचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा- Video: ‘आता होऊ दे धिंगाणा २’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! अंकुश चौधरीचा नवा रिअ‍ॅलिटी शो येणार भेटीस, पहिला प्रोमो आला समोर

व्हिडीओमध्ये वनिता खरात, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव सिंगापूरमध्ये मजा मस्ती करताना दिसत आहेत. हास्यजत्राच्या कलाकारांनी सिंगापूरमधील प्रसिद्ध स्थळांना भेटीही दिल्या. सुमितने हा व्हिडीओ शेअर करत, “काहीतरी रोमांचक लवकरच येत आहे” अशी कॅप्शनही दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनिताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास मालिका, चित्रपटांमधून वनिता प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मराठीबरोबरच तिने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. शाहीद कपूरच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटात वनिताने छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली होती. सध्या ती ‘सुंदरी’ या मालिकेत साहेब ही व्यक्तीरेखा साकारत आहे.