‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या मराठी मालिकेतून प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं ती सुत्रसंचालन करते. इतकंच नव्हे तर आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ती लंडनलाही गेली होती. आता लंडनहून भारतात परतल्यानंतर पुन्हा एकदा ती आपल्या कामाला लागली आहे. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्रीची लाइफस्टाइल नेमकी कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता तिच्या घराचा व्हिडीओ समोर आला आहे.

सोनी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजद्वारे प्राजक्ताच्या घराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती आपलं घर कसं आहे? हे दाखवताना दिसत आहे. प्राजक्ताचं घर तिच्या चाहत्यांनाही आवडलं आहे. तिच्या घरामधील सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे प्राजक्ताला मिळालेले पुरस्कार. तिने आपल्या घराच्या हॉलमध्ये आपल्याला मिळालेले प्रत्येक पुरस्कार ठेवले आहेत.

पाहा व्हिडीओ

इतकंच नव्हे तर तिला वाचनाची प्रचंड आवड आहे हे या व्हिडीओमधून स्पष्टपणे दिसून येतं. हॉलमध्येच तिने बऱ्याच प्रकारची पुस्तकं ठेवली असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबरीने हॉलला लागूनच तिचं स्वयंपाक घर आहे. तिचं छोटसं स्वयंपाक घर अगदी सुंदररित्या तिने सजवलं आहे.

आणखी वाचा – कित्येक वर्ष काम नाही, आर्थिक परिस्थिती बिकट अन्…; संजय कपूर यांच्या पत्नीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ताने स्वयंपाक घराला लागून जेवणाचा टेबल तयार करून घेतला आहे. पण तिच्या म्हणण्यानुसार प्राजक्ता या टेबलवर सतत काम करत असते. जेवताना ती या टेबलचा वापरच करत नाही. स्वयंपाक घरामध्ये मी फार वेळ रमत नाही असंही प्राजक्ता या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत नाही. घर खपू सुंदर आहे असं नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून म्हटलं आहे.