‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार मंडळींना प्रेक्षक भरभरुन प्रेम देतात. त्यातीलच एक कलाकाल म्हणजे अभिनेत्री ईशा डे. ईशाने आजवर या कार्यक्रमात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. ईशा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यामध्ये यशस्वी ठरली. आज ईशाचा वाढदिवस आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बऱ्याच कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समीर चौघुलेंनीही तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील काही स्किटमध्ये ईशा व समीर एकत्र काम करताना दिसतात. या दोघांना एकत्र काम करताना पाहून प्रेक्षकांनाही आनंद होतो. आता तिच्या वाढदिवसानिमित्त समीर यांनी तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. यामध्ये ईशाचं त्यांनी कौतुक केलं आहे. तसेच तिच्याबरोबर काम करताना आनंद होत असल्याचंही समीर यांचं म्हणणं आहे.

maharashtrachi hasyajatra fame gaurav more entry in Madness Machayenge hindi comedy show
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची हिंदी कॉमेडी शोमध्ये वर्णी, हेमांगी कवी व कुशल बद्रिकेबरोबर झळकला
maharashtrachi hasyajatra fame Vanita Kharat will soon be seen in an advertisement with Milind Soman
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्री ‘मेड इन इंडिया’ फेम मिलिंद सोमणबरोबर झळकणार, फोटो शेअर करत म्हणाली…
chetana bhat bought new car
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवीन गाडी; फोटो शेअर करत म्हणाली, “आज एक स्वप्न…”
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

आणखी वाचा – “कपड्यांवरून कुणाचीही मापं काढू नये” गावी जाऊन हेमांगी कवीने घातली मॅक्सी, फोटो पोस्ट करत म्हणाली, “मंडळातल्या…”

समीर म्हणाले, “ईशा वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्यावर्षीच आमच्या ‘हास्यजत्रे’मध्ये दाखल झालेला तगडा गडी. फारच कमी वेळात हिने हास्यजत्रेच्या वातावरणाशी जुळवून घेतलं. सहज सुंदर विनोदाची शैली आणि अत्यंत अप्रतिम आवाजाची दैवी देणगी लाभलेली आमची ईशा ही लंडन ड्रामा ग्रॅज्युएट आहे. अगदी ब्रिटिशांचं इंग्रजी बोलू शकणारी आमच्या हास्यजत्रेतली ही एकमेव कलाकार”.

आणखी वाचा – गरोदर आहे अंकिता लोखंडे? बेबी बंप लपवतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

“हिच्या डे आडनावावरून ही लोकांना बंगाली वाटते. पण ही महाराष्ट्रीयनच आहे. पण मग ती डे आडनाव का लावते? हा प्रश्न कृपया तिलाच विचारावा. स्वभावाने लोभस आणि तितकाच खट्याळपणा (किडे) जोपासणारी. आयुष्यात थोडं चांगलं किंवा थोडं मन हलवणार समोर घडलं की लगेच हिचे डोळे पाणवतात. कदाचित हळवेपणा हेच तिच्या स्वाभाविक अभिनयाचं मूळ आहे..आमच्या दोघांची जोडी स्किटमध्ये बेफाम फुलते. तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा”. ईशाला तिचे चाहते वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत आहेत.