सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. इतकंच नव्हे तर परदेशातही हा कार्यक्रम पाहिला जातो. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. प्रेक्षकही या हास्यवीरांना भरभरुन प्रेम देतात. अभिनेता गौरव मोरेलाही याच कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली. लंडनवरून काही दिवसांपूर्वीच भारतात आलेल्या गौरवचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…”

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी गौरव लंडनला गेला होता. यादरम्यानचे त्याचे अनेक फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये लंडन रिटर्न गौरवचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळणार आहे.

पाहा व्हिडीओ

सोनी मराठी वाहिनीने एका स्किटदरम्यानचा गौरवचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. यामध्ये तो “समीर चौगुले फक्त महाराष्ट्रात सुपाऱ्या मारतो मी लंडन रिटर्न आहे.” गौरवचा हा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – सर्जरी झाल्यामुळे मालिकेमधून घेतला ब्रेक, आता ‘आई कुठे काय करते’मध्ये पुन्हा परतणार अरुंधती, पुढे काय घडणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरवच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये परीक्षक सई ताम्हणकरही पोट धरून हसताना दिसत आहे. तसेच नेटकऱ्यांनीही या व्हिडीओला अधिकाधिक पसंती दिली आहे. गौरवचं हे नवं स्किट कसं असणार हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या भागामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.