Maharashtrachi Hasyajatra New Rap Song : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. हास्यजत्रेचे चाहते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आहे. अनेकदा या कार्यक्रमाचे विदेश दौरे देखील आयोजित करण्यात येतात. गेल्या वर्षभरात या कार्यक्रमाचे शो ऑस्ट्रेलिया, दुबई तसेच लंडनमध्ये देखील पार पडले आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या कार्यक्रमाविषयी नुकतीच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली असल्याची माहिती ‘सोनी मराठी’ वाहिनीने पोस्ट शेअर करत दिली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आता रात्री साडेनऊ ऐवजी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव सोमवार ते बुधवार रात्री ९ वाजता प्रक्षेपित केला जाईल. हा महत्त्वाचा बदल येत्या ३१ मार्चपासून करण्यात येणार आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची वेळ आता खास प्रेक्षकांसाठी रात्री नऊ वाजता करण्यात आलेली आहे. ही, आनंदाची एक जबरदस्त रॅप गाणं प्रदर्शित करत ‘सोनी मराठी वाहिनी’ने दिली आहे. “आयुष्यात मॅटर आहेत सतरा, काही टेन्शन नाही मित्रा, सगळ्यावरची एकच मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा…!” अशा ओळी या रॅपमध्ये आहेत. हे जबरदस्त रॅप साँग प्रसिद्ध रॅपर सुजय जिब्रीशने लिहिलं आहे.

हास्यजत्रेच्या नव्या रॅप साँगमध्ये समीर चौघुले, निखिल बने, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, श्रमेश बेटकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, दत्तू मोरे, ईशा डे, चेतना भट, वनिता खरात, नम्रता संभेराव या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. याशिवाय परीक्षक प्रसाद ओक-सई ताम्हणकर आणि निवेदिका प्राजक्ता माळी ही मंडळी सुद्धा या रॅप साँगच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Maharashtrachi Hasyajatra
महाराष्ट्राची हास्यजत्रा ( Maharashtrachi Hasyajatra )

दरम्यान, हास्यजत्रेच्या या नव्या रॅप गाण्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. हे रॅप लिहिणारा लेखर सुजय जिब्रीशने यापूर्वी सोशल मीडियावर सुपरहिट ठरलेलं ‘माझ्याशी नीट बोलायचं’ हे रॅप साँग लिहिलं होतं. यामध्ये अलोक राजवाडे मुख्य भूमिकेत झळकला होता.