सध्या अभिनेत्री प्रार्थना बेहरे झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेमध्ये ती साकारत असलेलं नेहा हे पात्र प्रेक्षकांना फार आवडतं. पण सध्या मालिकेमध्ये नेहाचा अपघात झाला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे नेहाला पुन्हा मालिकेमध्ये परत आणा अशी मागणी प्रेक्षक करत आहेत. पण या सगळ्या चर्चा सुरु असताना नेहा म्हणजेच प्रार्थना मात्र दिवाळी सेलिब्रेट करण्यात मग्न आहे.

आणखी वाचा – करीनाचा लेक जमिनीवर लोळला तर आलियाने लपवलं बेबी बंप, कपूर कुटुंबियांचं दिवाळी सेलिब्रेशन पाहिलंत का?

कलाकार मंडळी सध्या चित्रीकरणामधून वेळ काढत दिवाळी सेलिब्रेट करत आहेत. तसेच बऱ्याच कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे दिवाळी साजरी करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. प्रार्थनाही आपल्या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करत आहे.

पाहा व्हिडीओ

प्रार्थनाने तिच्या घरामधील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या पतीसह कुटुंबातील इतर मंडळींबरोबर धमाल करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रार्थनाच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. तसेच ती आपल्या नवऱ्याबरोबर रोमँटिक झालेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – ‘कांतारा’ चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कर्नाटकातील धक्कादायक घटना समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रार्थनाच्या घराचं आकर्षक इंटेरियर, मोठा फिश टँक तसेच आलिशान घर विशेष लक्षवेधी आहे. प्रार्थनाच्या या व्हिडीओला काही तासांमध्येच हजारो व्ह्युज मिळाले आहेत. तर तिच्या चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून प्रार्थनाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत