अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत ती अनेक हिंदी पुरस्कार सोहळ्यांमध्ये झळकली आहे. तर आता पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर तिचा मराठमोळा अंदाज समोर येणार आहे.

सध्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याची सगळीकडे चर्चा आहे. याचा विशेष कारण म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा या पुरस्कार सोहळ्यामध्ये हजेरी लावणार आहे. या पुरस्कार सोहळा दरम्यानचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्याप्रमाणे मलायका करत असलेल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा : ५० नाही तर ‘इतक्या’ वर्षांची झाली मलायका अरोरा, अभिनेत्रीने तिचं खरं वय सांगूनच टाकलं, म्हणाली…

झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये मलायका हजेरी लावून मराठी आणि तिच्या हिंदी गाजलेल्या गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करणार आहे. तर याबरोबरच व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये ती श्रेया बुगडेबरोबर मंचावर बेसनाचे लाडू वळताना दिसत आहे. त्याबरोबरच ती सलील कुलकर्णीकडे पाहून मराठीत म्हणते, “फक्त लड्डू देणार, पण मी नाही येणार हं.”

हेही वाचा : “भुवनेश्वरीला मिस करतोय, या आता परत…”, मालिकेतून ब्रेक घेऊन अमेरिकेला गेलेल्या कविता मेढेकरांचं चाहत्याच्या कमेंटवर खास उत्तर म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर आता मला एकाचा हा मराठमोळा अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत. यानिमित्ताने सर्वांना पहिल्यांदाच मलायकाचं मराठी बोलणं ऐकायला मिळणार आहे. हा पुरस्कार सोहळा ५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना पाहता येईल.