सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतमधील त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी त्यांचं जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येनंतर कलाविश्वासह अनेक कलावंताना तसेच संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवणारा एक उमदा कलाकार गेल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नुकतंच मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रिना मधुकरने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

रिना मधुकर ही मन उडू उडू झालं या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने सानिका देशपांडे ही भूमिका साकारली होती. रिनाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने नितीन देसाई यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “मराठी पाऊल पडते पुढे’चा सेट, रस्सीच्या मदतीने बनवलेला धनुष्यबाण अन्…”, नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर कर्मचाऱ्याने केला धक्कादायक खुलासा

रिना मधुकरची पोस्ट

दादा, हे बरोबर नाही केलत तुम्ही. हे असं नव्हतं करायला पाहिजे होतं.अनेकांचे मार्गदर्शक होतात तुम्ही, त्यातलीच मी सुद्धा एक. चित्रपटसृष्टीला आज एक मोठा धक्का देऊन आपण गेलात हे मान्यच होत नाहीये. तुम्ही दिलेली संधी आणि तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण नेहमी आठवणीत राहतील. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो,असे रिना मधुकरने म्हटले आहे.

आणखी वाचा : शिंदेशाहीतला एक तारा निखळला, आनंद शिंदेंच्या पुतण्याचं निधन

दरम्यान नितीन देसाई यांनी ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास, हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. तर त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते.