‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे अभिनेत्री मानसी नाईक प्रसिद्धीझोतात आली. सध्या मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. आपल्या दैनंदिन आयुष्याबाबत माहिती देणारे अनेक पोस्ट मानसी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

हेही वाचा : Gadar 2 Trailer : “…तर अर्ध्याहून जास्त पाकिस्तान खाली होईल”, ‘गदर २’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, सनी देओलच्या जबरदस्त ॲक्शनने वेधले लक्ष

मानसीने नुकतीच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेसाठी खास पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओ पोस्टच्या कॅप्शनमध्ये मानसी लिहिते, “माझी काहीच ओळख नसताना तिने मला मोठे होताना पाहिले आहे. एक अभिनेत्री, कलाकार, मैत्रीण, करिअर गाइड म्हणून तिने मला कायम पाठिंबा दिला. ती कायम माझ्याबरोबर होती.”

हेही वाचा : “पुरूषांची जात…”, मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी सोनाली कुलकर्णीची संतप्त पोस्ट, म्हणाली…

“ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर व्यक्ती आणि विलक्षण अभिनेत्री आहे. तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम! मी आयुष्यात कधीच हार मानणार नाही. लवकरच तिच्यासह मी येत आहे…” असे लिहित मानसी नाईकने भार्गवी चिरमुलेला टॅग केले आहे.

हेही वाचा : “मित्रांनी हजारो रुपये बुडवले”, विजू मानेंच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेने शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, “रम्मीच्या डावात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसीने हे खास कॅप्शन लिहित, भार्गवी चिरमुलेबरोबर खास डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला मानसीने “अधीर मन झाले…” हे गाणे जोडले आहे. मानसीने शेअर केलेल्या व्हिडीओवर तेजस्वी लोणारीने “मी वाट पाहू शकत नाही” अशी कमेंट केली आहे. त्यामुळे मानसी आणि भार्गवी आता कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार? याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.