मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणून आस्ताद काळे याला ओळखले जाते. तो नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. त्याला त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातो. तो कायमच त्याची मत अगदी रोखठोक मांडताना दिसतो. अनेकदा तो विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतो. नुकतंच आस्तादने एका पुरस्कार सोहळ्यावर टीका केली आहे. आस्ताद काळे हा फेसबुकवर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. नुकतंच आस्तादने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एका पुरस्कार सोहळ्याबद्दल त्याचं मत मांडले आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे. आणखी वाचा : “…अन् मी झी मराठीवरील त्या मालिकेतील एक-दोन प्रसंग भोगले” आस्ताद काळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत "Favourite कोण हे जर खरंच प्रेक्षक ठरवत असतील, तर त्या वर्षी Box Office ला सर्वात जास्त उत्पन्न असलेला चित्रपट निदान नामांकनांमधे यायला हवा ना महाराजा? व्हय की नाही महाराजा??", असा प्रश्न त्याने या पोस्टद्वारे केला आहे. आणखी वाचा : “हर हर महादेव बघायला जाताना भीती…” आस्ताद काळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत आस्तादने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी या पोस्टवर कमेंट करत त्याला नेमका विषय काय असा प्रश्न विचारला आहे. आस्ताद काळेने अप्रत्यक्षपणे 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या नामांकन सोहळ्यावर तोफ डागली आहे, असं म्हटलं जात आहे. तर काहींनी आस्तादचा रोख 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या नामांकन सोहळ्याकडे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र त्याने यावर काहीही उत्तर दिलेलं नाही.