‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेकडे पाहिले जाते. तो कायम विविध कारणांनी चर्चेत असतो. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत असतात. नुकतंच कुशल बद्रिकेने त्याच्या एका मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत त्याने त्याच्या मित्राला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याने मित्र काय असतं याबद्दलही भाष्य केले आहे.
आणखी वाचा : हेमंत ढोमे क्षिती जोगला ‘पाटलीण’ या नावाने का हाक मारतो? खुलासा करत म्हणाला, “लग्नानंतर…”

“मित्र, ह्याने मला शिकवलं की “मित्र” असण्यासाठी तुम्हाला काही वेगळं करावं लागत नाही, बस फक्त सोबत असावं लागतं. जेंव्हा तुमच्या सोबत कुणी नसतं तेंव्हा सुद्धा आणि जेंव्हा अख्खं जग तुमच्या सोबत असतं तेंव्हा सुद्धा. I love you मित्रा आणि happy birthday”, असे कॅप्शन कुशल बद्रिकेने दिले आहे.

कुशलच्या या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने कमेंट केली आहे. संतोष जुवेकरने कुशलच्या मित्राला टॅग करत “दाद्या मला पण भेटना”, असे म्हटले आहे. त्यावर कुशलने हटके प्रतिक्रिया दिली आहे. “तू मला आधी भेट”, असे कुशलने संतोष जुवेकरला सांगितले आहे.

santosh juvekar
संतोष जुवेकरची कमेंट

आणखी वाचा : “हा माझ्यासाठी हिंसाचार…”, हेमांगी कवीचे ट्रोलरला सडेतोड उत्तर, म्हणाली “असली माणसं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कुशलच्या या पोस्टवर त्याचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केला आहे. तर काहींना ‘दादा’ असे म्हणत यावर कमेंट केल्या आहेत.