मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. अनेकदा तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना पाहायला मिळतो. नुकतंच शशांकने एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

शशांक केतकर हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच शशांकने एका जिन्यावर उभं राहून फोटो शेअर केला आहे. यात तो हाताची घडी घालून एकटक कुठेतरी पाहताना दिसत आहे.
आणखी वाचा : “…मग माझ्याच बाबतीत असं का घडावे”, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “या जन्मी नातेवाईक…”

शशांकने या फोटोला हटके कॅप्शनही दिले आहे. “माझ्यावर सर्वांची नजर”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. त्याबरोबर त्याने कॅमेऱ्याचा इमोजीही शेअर केला आहे.

शशांकच्या या पोस्टवर त्याची पत्नी प्रियांका केतकरने कमेंट केली आहे. “…आणि तुझी नजर ही फक्त माझ्यावरच असावी”, अशी कमेंट प्रियांकाने केली आहे. त्याबरोबर तिने हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : Video : “मला वेड लागले प्रेमाचे…” मानसी नाईकचा प्रसिद्ध रिल स्टारबरोबरचा व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले “ही जोडी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शशांकच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. “शशांक तु इतका गोड हॅडसंम आहेसच मगं लोकांच्या नजरा तुझ्या वरचं असणार आणि आमच्या आवडीचा मराठीतला सुपरस्टार हिरो आहेस”, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. “तू इतका हँडसम दिसतोस आणि तुझी स्माईलही”, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे.