मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखले जाते. शशांक केतकरची पत्नी प्रियांकाला एक आजार झाला आहे. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

प्रियांका केतकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच शशांक आणि प्रियांकाने ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी प्रियांकाच्या आवाजात काहीतरी अडचण असल्याचे अनेक चाहत्यांना जाणवलं. त्यानिमित्ताने तिने पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.
आणखी वाचा : “सर्वांची नजर माझ्यावर” शशांक केतकरच्या ‘त्या’ फोटोवर पत्नीची कमेंट, म्हणाली “आणि तुझी…”

प्रियांका केतकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. “चला हवा येऊ द्या’ च्या आगामी भागात मी सहभागी झाले होते. त्यावेळी माझ्या आवाजाला काय झालं? असे अनेक मेसेज मला आले होते. माझ्याबद्दल काळजी करणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की मला घशासंबंधित आजार झाला आहे. सध्या मी त्यावर उपचार घेत आहे. हा आजार लवकर बरा होईल, अशी मी आशा करते, अशी पोस्ट प्रियांकाने केली आहे.

priyanka ketkar
प्रियांका केतकर

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ची जादू कायम, चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केलेले फक्त ‘इतके’ रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शशांक केतकर हा सध्या ‘मुरांबा’ या मालिकेत झळकत आहे. ‘होणार सून मी या घरची…’ या मालिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. शशांक केतकरने मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. त्याने मराठी कलासृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. उत्तम नायक ते खलनायक अशा सर्वच भूमिका त्यानं साकारल्या.