छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. अभिनेता शिव ठाकरे हा बिग बॉसमुळे घराघरात पोहोचला. शिव ठाकरे हे नाव आता सर्वत्र लोकप्रिय झाले आहे. ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ आणि बिग बॉस हिंदी अशा अनेक कार्यक्रमामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. नुकतंच शिव ठाकरे बॉलिवूड अभिनेता सलमान खानबद्दल भाष्य केले आहे.

शिव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच शिवने ‘इन्स्टंट बॉलिवूड’ला मुलाखत दिली. यावेळी त्याला सलमान खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. यावर त्याने फार मजेशीरपद्धतीने उत्तर दिले.
आणखी वाचा : ‘…तरच मी काढेन’ वीणाच्या नावाचा टॅटू लपवण्यावर शिव ठाकरे स्पष्टच बोलला

“मी सलमान खानला बघून बॉडी बनवली. मला ते माणूस म्हणून खूप जास्त आवडतात. एक अभिनेता म्हणूनही मला ते फार आवडतात. त्याच्या तुलनेत मी फार लहान माणूस आहे. सलमान खान तुम्हाला कॅमेऱ्यात तुम्हाला जे समजवून सांगतात, त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगल्या पद्धतीने समजवतात. ते बेस्ट आहेत”, असे शिव ठाकरे म्हणाला.

“सलमान खानबद्दल मला जितका आदर आहे, तितकीच मला त्यांची भीतीही वाटते. त्यांनी आज आमची शाळा घेऊ नये, अशी आम्ही प्रार्थना करायचो. आठवड्याच्या शेवटी मी फिंगर क्रॉस करुन बसायचो. पण तेव्हा असंही असायचं की जरी ते ओरडले तरी तुला सलमान खान ओरडलाय ब्रो, असं आमचं व्हायचं”, असे शिव ठाकरेने म्हटले.

आणखी वाचा : “माझ्या तोंडाजवळचा घास…” मराठी चित्रपट न करण्याबद्दल शिव ठाकरेचे भाष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बिग बॉस १६ च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये एमसी स्टेन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोट होते. या पाच जणांमध्ये एमसी स्टॅनला सर्वाधिक मतांनी विजयी ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी, ३१ लाख आणि गाडी देण्यात आली.