मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून तो कायमच चर्चेत असतो. त्याने त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर या पुन्हा विवाहबंधनात अडकल्या आहेत. त्याने पोस्ट शेअर याबद्दलची गुडन्यूज दिली.

सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. नुकतंच सिद्धार्थने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याची आई दिसत आहे. सिद्धार्थने त्याच्या आईचे पुन्हा लग्न लावून दिले आहे. त्याबद्दल त्याने एक पोस्ट शेअर आहे.
आणखी वाचा : Photos : मिताली मयेकरचा अंघोळ करतानाचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले “मनावरचा ताबा…”

सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट

“Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं?

तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life”, असे सिद्धार्थ चांदेकरने म्हटले आहे.

आणखी वाचा : “कायम असंच…” सिद्धार्थ चांदेकरने आईला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, फोटो चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सिद्धार्थ चांदेकरच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. या पोस्टवर मधुराणी प्रभुलकर, गौतमी देशपांडे, निवेदिता सराफ, स्पृहा वरद, ऋतुजा बागवे यांसारख्या अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी काकूंना शुभेच्छा असं म्हणत इन्स्टाग्रामवर कमेंट केली आहे.