मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून स्वप्निल जोशीला ओळखले जाते. मोठ्या कालावधीनंतर स्वप्निल जोशीने मालिका विश्वात पदार्पण केले. सध्या तो ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत झळकत आहे. मात्र यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. नुकतंच स्वप्निल जोशीने यावरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे.

स्वप्निल जोशीने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमात त्याने आतापर्यंत काम केलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. नुकतंच स्वप्निल जोशीने आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतले. यावेळी त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने स्वप्निलला “चांगल्या मराठी मालिकांमध्ये काम करत जा”, असा सल्ला दिला.
आणखी वाचा : “माझ्यासाठी तोच विजेता…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारताच मराठी अभिनेत्याचे थेट उत्तर

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

त्यावर स्वप्निल उत्तर देत म्हणाला, “आणि चांगलं काय।? हे कोण ठरवणार।!? तिथे गोंधळ आहे !.” यावर त्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिली आहे. “ते प्रेक्षक ठरवतील. पण एक चांगला अभिनेता म्हणून तुला अशा मालिकेत पाहायला आवडत नाही”, असे त्या व्यक्तीने म्हटले. त्यावर स्वप्निल जोशीने ‘नोंद घेतलीय’ असे म्हटले आहे.

दरम्यान स्वप्निल जोशीचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या या ट्वीटवर अनेक चाहते विविध कमेंट करताना दिसत आहेत. यातील काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे. ‘सर्व सीरियल चांगल्याच असता फक्त त्या जास्त ताणल्या की बोर करतात’, अशी कमेंट एकाने केली आहे.

आणखी वाचा : “वादात पडणं हे…” ऐतिहासिक चित्रपटावरुन होणाऱ्या वादावर स्वप्निल जोशीचे थेट वक्तव्य

तर एकाने “आपली आपली चॉईस असते, कोणाला गोड आवडत नाही कोणाला नाईलाजाने कार्ले खावी लागतात आणि त्यालाच गोड मानव लागते.. मराठी सिरियल्स छान असतात पाहणार्‍यांना दृष्टिकोन असायला हव… श्रीकृष्ण पासून checkmate, समांतर, बळी, walvi पर्यंत चा प्रवास बहुतेक महाशयांनी पाहिला नसाव…”, असे म्हटले आहे.