मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून स्वप्निल जोशीला ओळखले जाते. मोठ्या कालावधीनंतर स्वप्निल जोशीने मालिका विश्वात पदार्पण केले. सध्या तो ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत झळकत आहे. स्वप्निल जोशी हा कामाबरोबर विविध सामाजिक कार्यातही सक्रीय असतो. नुकतंच त्याने सामाजिक कार्यात केलेल्या दानधर्माबद्दल भाष्य केले आहे.

स्वप्निल जोशीने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमात त्याने आतापर्यंत काम केलं आहे. तो उत्तम लेखनही करतो. विशेष म्हणजे तो दानधर्म करतानाही दिसतो. पण याबद्दल तो कधीही काहीही का सांगत नाहीस, असं का? असा प्रश्न स्वप्निल जोशीला विचारण्यात आला.
आणखी वाचा : “हे ठरवणार कोण…” ‘चांगल्या मराठी मालिकांमध्ये काम करत जा’ म्हणणाऱ्याला स्वप्निल जोशीने सुनावले

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Joseph Mengele nazis Doctor The Disappearance of Josef Mengele
चारचौघांतला ‘क्रूरकर्मा’!
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..

त्यावर तो म्हणाला, “ज्या गोष्टी आपण स्वत:साठी करतो, त्याविषयी मला बोलायला आवडत नाही. लेखन आणि चॅरिटी या त्यापैकीच दोन गोष्टी. मी कविता, लेख, कथा लिहितो. यातून माझ्या भावनांचा मी वाट मोकळी करुन देतो आणि चॅरिटी ही मी मन:शांती तसेच माझ्या मुलांसाठी करतो. मी केलेल्या दानधर्माचं पुण्य माझ्या मुलांना मिळावं, असं मला वाटतं.”

आणखी वाचा : “माझ्यासाठी तोच विजेता…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारताच मराठी अभिनेत्याचे थेट उत्तर

दरम्यान मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. स्वप्निल जोशी हा सध्या त्याच्या ‘वाळवी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.