झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेने संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच अनेक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं. त्यामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं. या मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडेने राणूबाई शिवाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली होती. नुकतंच या मालिकेच्या दिग्दर्शकांनी तिच्याबद्दल एक खुलासा केला आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडेचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचे दिग्दर्शक विवेक देशपांडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अश्विनी महांगडेच्या ऑडिशनचा किस्सा सांगितला आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.
आणखी वाचा : “आपण ८ वर्षांपूर्वी…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंडची पोस्ट, म्हणाली…

विवेक देशपांडेची पोस्ट

“मी स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका करत असताना एक मुलगी, एका मह्त्त्वाच्या रोलसाठी ऑडिशन द्यायला येते, यापूर्वी काय केलंय? असं विचारलं, तर एका गाजलेल्या मालिकेत मेन लिडची सहकारी! हे उत्तर आल्यावर मला तीची ओळख पटते. आलेल्या अनेक मुलीं मधुन shortlist होतं होतं शेवटच्या दोन मधे ती येते पण, creative head च्या मते, हीची confidence level दुसरीपेक्षा जरा कमीच दिसल्यामुळे, हिच्या नांवाला फुल्ली बसते. (माझं मत वेगळं असतं) पण – but – लेकिन – किंतु – परंतु मुलगी माझ्या लक्षात राहते.

पुढे आमच्या मालिकेत पुन्हा एक नवीन पात्र येतं. पुन्हा ऑडिशन्स घ्यायचं ठरतं. मी म्हणतो “त्या reject झालेल्या मुलीलाच बोलवा. ऑडिशनसाठी नको सरळ look test.” – ती येते, look test होते आणि reject झालेली ती हिचका?! असा प्रश्न उभा करुन जाते आणि राणुअक्का ही आधीच्या भुमिकेपेक्षा जास्त मह्त्त्वाची भुमिका तिला मिळते. त्या भुमिकेचं, खणखणीत नाणं वाजवत ती रसिकांच्या मनात तर जागा मिळवतेच, पण माझ्या मनातही घर करुन राहु लागते, माझी मानसकन्या म्हणुन! राणुअक्का नंतर मेरे साई मधे एक मह्त्त्वाची भुमिका,आई कुठे काय करते मधे अनघा महाराष्ट्र शाहिर मधे माई अशा विविधरंगी भुमिका गाजवत, वाटचाल करत असताना अहिल्याबाई होळकर हि तोलामोलाची भुमिका साकारण्याची संधी तीला मिळते हे सोन्याहुन पिवळं! ती ही अश्विनी महांगडे!! समाजभान जागृत असलेली संवेदनशील कलावंत. वाढदिवसानिमित्त अश्विनीला अनेकोत्तम आशीर्वाद !”, असे विवेक देशपांडे यांनी सांगितले.

आणखी वाचा : Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्याचा जोडीदार, नात्यावर शिक्कामोर्तब करीत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अश्विनी महांगडे ही सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा हे पात्र साकारत आहे. या मालिकेतील तिच्या पात्राला चांगली लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. तिच्या वाढदिवसानिमित्त अनेकजण तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.