अभिनेत्री केतकी चितळे गेल्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आली आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेले असताना केतकीने त्यांच्याशी हुज्जत घातली. तसेच आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केली. महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जाब विचारत केतकी म्हणाली होती, “तुम्ही मराठा म्हणजे माझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी टाकणार नाहीत. मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे. संविधान आणि कायदा सर्वांसाठी समान नाही. जातींवर आधारित कायदे बनवले जात आहेत.” यावरून केतकी ट्रोल झाली. अशातच तिने आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यावर पोस्ट शेअर केली आहे.

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील म्हणाले होते, “धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल. मग बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना.” मनोज जरांगे पाटलांच्या याचं वक्तव्यावर केतकीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे.

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

हेही वाचा – “लग्न कधी करणार?”, चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक म्हणाली,”ठिकाण, कार्यक्रम अन्…”

केतकीने मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा फोटो शेअर करून लिहिल आहे, “आता कसे, खरे रूप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये. आता तरी जागे व्हा.” केतकीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

दरम्यान, केतकी चितळे सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती प्रसिद्ध आहे. तिने स्टार प्रवाहवरील ‘आंबट गोड’, झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं होतं. शिवाय केतकी हिंदीमधील सोनी टीव्हीवरील ‘सास बिना सुसराल’ या मालिकेतही झळकली होती.