मराठी सिने व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. स्वानंदी नेहमी फोटो, व्हिडीओसह वडिलांच्या आठवणी शेअर करत असते. त्यामुळे ती चर्चेत असते. नुकतंच तिने लग्नाविषयी भाष्य केलं आहे.

स्वानंदी बेर्डेने काल ‘आस्क मी सेशन’द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. लक्ष्मीकांत बेर्डेंसह वैयक्तिक आयुष्याविषयी चाहत्यांनी स्वानंदीला विचारलं. एका चाहत्याने तिला लग्नाविषयी विचारलं? तेव्हा स्वानंदी काय म्हणाली? जाणून घ्या…

Rashmika Mandanna on atal setu
रश्मिका मंदानानं अटल सेतूचं कौतुक करताच काँग्रेसची खोचक पोस्ट; ‘गुड जॉब’ म्हणत दिली सविस्तर आकडेवारी!
9th anniversary of Manachi organization
‘मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात
Madhuri Dixit got emotional after seeing sons and sister video
Video: माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीला पाहिलंत का? ‘तो’ खास व्हिडीओ पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर
MLA Dattatray Bharne first reaction On Viral video
कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवर दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “तो कार्यकर्ता नव्हता तर…”
what is hallucinations
तरुणाला आजूबाजूला दिसते करीना; मानसोपचार तज्ज्ञांकडून जाणून घ्या, नेमका हा प्रकार काय?
rajan vichare eknath shinde
“आनंद दिघेंनी राजन विचारेंना त्यांच्या भाषेत…”, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; म्हणाले, “धर्मवीरच्या दुसऱ्या भागात…”
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
police reaction on Gurucharan Singh missing
गुरुचरण सिंग बेपत्ता असण्याबद्दल पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सीसीटीव्हीत जे दिसतंय त्यानुसार ते…”

हेही वाचा – Video: शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या हळदीचा व्हिडीओ आला समोर, थिरकताना दिसले ‘बिग बॉस मराठी’चे कलाकार

स्वानंदीला त्या चाहत्याने विचारलेलं की, तू लग्न कुठल्या वर्षी करणार? चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत स्वानंदी म्हणाली, “ठिकाण, समारंभ, ड्रेसेस हे माझ्या डोक्यात आधीच ठरलेलं आहे. फक्त आता….”

हेही वाचा – Video: साखरपुड्यात शिवानी सुर्वेला अंगठीला घालताना अजिंक्यचा झाला गोंधळ, पाहा व्हिडीओ

स्वानंदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तसंच तिने ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकातून रंगमंचावरही पदार्पण केलं. या नाटकात स्वानंदीबरोबर तिची आई प्रिया बेर्डे मुख्य भूमिकेत काम करत आहे. दरम्यान, येत्या काळात काही मराठी चित्रपटांमध्ये स्वानंदी झळकणार आहे.