लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्षिती जोग हिने हिंदी व मराठी चित्रपट, हिंदी व मराठी मालिका तसेच वेब सीरिजमध्ये काम करूप आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिने आता ‘अनुपमा’ व ‘क्यूंकि सास भी कभी बहू थी २’ या मालिकांमध्ये एंट्री करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली. चांगली भूमिका असेल तर टीव्हीवर काम करायला नक्की आवडेल, असं तिने सांगितलं.
क्षितीने जोग हिने आजवर अनेक हिंदी व मराठी चित्रपट, तसेच मालिका व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. क्षिती नुकतीच ZEE5 वरील ‘बाई तुझ्यापायी’ या सीरिजमध्ये झळकली. तिने एका मुलाखतीदरम्यान टीव्ही प्रोजेक्ट्सबद्दल खुलासा केला. तिने यापूर्वी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये अक्षराच्या (हिना खान) सावत्र सासूची भूमिका साकारली होती.
‘अनुपमा’ आणि ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी २’ सारख्या जास्त टीआरपी असलेल्या शोमध्ये एंट्रीबद्दल विचारलं असता क्षितीने तिचं मत व्यक्त केलं. जर दमदार भूमिका दिल्या तर या प्रोजेक्ट्समध्ये नक्कीच काम करेन, असं क्षितीने नमूद केलं.
हिंदी मालिकांमध्ये काम करण्याबद्दल क्षितीची प्रतिक्रिया
बॉलीवूड लाईफशी बोलताना क्षिती जोगने सांगितलं की तिने यापूर्वी राजन शाहींबरोबर काम केलं आहे. आणि संधी मिळाल्यास या लोकप्रिय शोचा भाग व्हायला तिला आवडेल. ती म्हणाली, “जर मला चांगली भूमिका मिळाली तर मी ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी २’ आणि ‘अनुपमा’ सारख्या शोमध्ये नक्कीच काम करेन. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये माझी प्राथमिकता माझी भूमिका असते.”
क्षिती अलिकडे मराठी इंडस्ट्रीत जास्त काम करतेय. तसेच ओटीटी प्रोजेक्ट्समध्येही ती काम करत आहे. पण असं असलं ती तिने टीव्हीपासून दूर न गेल्याचं स्पष्ट केलं. “टीव्ही माझे मूळ आहे. जर एखादी दमदार भूमिका असेल आणि आशय चांगला असेल तर मी का नकार देईन?” असं क्षिती जोग म्हणाली. म्हणजेच जर क्षिती जोगला चांगल्या भूमिकेची ऑफर आली तर ती हिंदी टीव्ही मालिकांमध्ये पुन्हा अभिनय करताना दिसेल.
कामाच्या तासांबद्दल क्षिती जोग म्हणाली….
क्षितीने टीव्ही इंडस्ट्रीमधील कामाच्या तासांबद्दलही महत्त्वपूर्ण विधान केलं. कलाकारांना अनेकदा मोठ्या शिफ्टमध्ये काम करावे लागतं, असं तिने सांगितलं. “एक काळ असा होता जेव्हा मी सलग ४८ तास शूटिंग करायचे. नंतर मला जाणवले की इतक्या तासांच्या शिफ्ट करणं चांगलं नाही. तसेच जबाबदाऱ्या फक्त महिलांवर टाकू नये. जर कुटुंब असेल तर पतींनीही मदत करणं महत्त्वाचं आहे,” असं मत क्षिती जोगने व्यक्त केलं.
