‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमधून अभिनेत्री मृणाल दुसानिसने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मृणालचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच अभिनेत्रीला छोट्या पडद्यावरची लोकप्रिय नायिका म्हणून ओळखलं जातं. ‘हे मन बावरे’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर मृणाल अमेरिकेत शिफ्ट झाली होती.

मृणालने करिअरच्या शिखरावर असताना २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. यानंतर काही वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये ती आपल्या पतीबरोबर अमेरिकेत राहायला गेली. यानंतर मृणालने गोंडस मुलीला जन्म दिला. आता जवळपास चार वर्षांनी अभिनेत्री आपला नवरा आणि लेकीबरोबर भारतात परतली आहे. चार वर्ष कलाविश्वापासून दूर असली तरीही अभिनेत्रीची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. गेल्या काही दिवसांत मृणालने बऱ्याच मुलाखतींना उपस्थिती लावली. यावेळी तिने भारतात परतण्याचा निर्णय का घेतला, तिची लेक नुर्वी याबद्दल भरभरून सांगितलं आहे. आता नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत मृणालने अमेरिका आणि भारतातील राहणीमानावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “लहान भूमिका, ३ दिवसांचं शूटिंग…”, मराठमोळ्या जितेंद्र जोशीची अनुराग कश्यपसाठी खास पोस्ट, दिग्दर्शकाच्या कमेंटने वेधलं लक्ष

अमेरिकेतल्या राहणीमानाबद्दल विचारलं असता मृणाल म्हणाली, “तिकडे किचनमध्ये काम करताना डिशवॉशर वगैरे या गोष्टी असतात हे मला मान्य आहे. पण, खरं सांगायचं झालं, तर अमेरिकेत राहणं खूप अवघड आहे आणि भारतात राहणं खूप सोपं आहे. आपल्याकडे घरकामाला मदतनीस ( हाऊसहेल्प) येतात. पण, तिथे कुणीच नसतं…त्यामुळे डिशवॉशर असला तरीही त्यात भांडी नीट आपल्याला लावावी लागतात. एवढेच नव्हे तर, आम्ही फर्निचर घ्यायचो तर ते जोडावं सुद्धा आम्हालाच लागायचं.”

हेही वाचा : Video : ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा लेक दवाखान्यात अचानक गाऊ लागला ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाणं, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृणाल पुढे म्हणाली, “आपण मुळात अमेरिकेचे नसल्याने आपल्याला सगळ्या भारतीय गोष्टींची सवय आहे. कामाची सवय आहे. मी सगळी घरची कामं करतेच त्यामुळे आपल्याला तसा काही त्रास होत नाही. पण, मला इथे ( आपल्या देशात ) जास्त आवडतं. अमेरिकेत स्वच्छता होती ही एक गोष्ट मला खूप आवडते. पण, इथे शेवटी आपली लोक आहेत. त्यामुळे भारतातच जास्त मजा आहे.”