मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाडला ओळखले जाते. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’मधून प्राजक्ता घराघरांत पोहचली. या मालिकेत तिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर प्राजक्ता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअऱ करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान, प्राजक्ताच्या नव्या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्रामवर तिच्या गावातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शेतात जाऊन कोथिंबीर निवडताना दिसत आहे. प्राजक्ताचे कुटुंब शेतकरी आहे. प्राजक्ता अनेकदा तिच्या गावाकडचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना माहिती देत असते. आता या नव्या व्हिडीओमध्ये प्राजक्ताने आपल्या शेताची झलक दाखवली आहे.

Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India
“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक
sundara manamadhe bharli akshaya naik
“जेवढ्या लोकांनी हिणवलं…”, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीने बॉडी शेमिंगबद्दल मांडलं मत; म्हणाली, “जाड असण्याबद्दल…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

हेही वाचा- लग्नानंतर ‘या’ ठिकाणी फिरायला गेलीय स्वानंदी टिकेकर, फोटो शेअर करत दाखवली झलक

प्राजक्ताने व्हिडीओ शेअर करत लिहिले, “त्याचं झालं असं, आजी म्हणाली कोथिंबिरीच्या वड्या करुयात, मग म्हटलं आणूयात कोथिंबीर शेतात जाऊन”, अशी कॅप्शनही तिने दिली आहे. प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. एकाने “झाल्या का कोथिंबीर वड्या बनवून” अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्याने कमेंट करत “शेतात चप्पल नसते घालायची” असे म्हटले आहे.

प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर मालिका, चित्रपट नाटकांमधून प्राजक्ता प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. प्राजक्ता अभिनेते अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये झळकली आहे. तिने आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. लवकरच ती एका दाक्षिणात्य चित्रपटातही झळकणार आहे.