मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. अभिनयाने कलाविश्वात स्वत:ची ओळख निर्माण करणारी प्राजक्ता सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते. प्राजक्ताने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ताच्या भावाचं लग्न नुकतंच पार पडलं. याच लग्नसोहळ्यातील फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत. या विवाहसोहळ्यासाठी तिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर व केसांत गजरा माळून पारंपरिक लूक केला होता. मराठमोळ्या वेशात फारच सुंदर दिसत होती. तिने पुन्हा एकदा तिच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला.

हेही वाचा >> ‘पॉवर रेंजर’ फेम जेसन डेव्हिड फ्रॅंकचं निधन, ४९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्राजक्ताच्या चाहत्यांपैकी एकाने फोटोवर केलेली कमेंट सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. “मी लग्न करू की नको?” असं प्राजक्ताच्या फोटोवर कमेंट करत चाहत्याने विचारलं आहे. प्राजक्ताने चाहत्याच्या या कमेंटवर रिप्लाय करत “करुन टाका माझा काही भरवसा नाही”, असं उत्तर देत हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

हेही वाचा >> “निधनानंतर दोन दिवस…” तबस्सूम यांच्या शेवटच्या इच्छेबाबत मुलाचा खुलासा

prajakta mali

प्राजक्ताने दिलेल्या या उत्तरावर चाहत्यानेही कमेंट करत “भरवसा नसतो तेच पहिलं लग्न करतात”, असं म्हटलं आहे.

prajakta mali

हेही पाहा >> Photos : सात बेडरुम, ११ बाथरुम, स्विमिंगपूल अन्…; प्रियांका चोप्रा-निक जोनस यांच्या अमेरिकेतील १४४ कोटींच्या आलिशान घराची झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. तिने मालिकांसह चित्रपटांतही काम केलं आहे. ‘रानबाझार’ या वेब सीरिजमधून प्राजक्ताने ओटीटीवर पदार्पण केलं. आता ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.