मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. नुकतंच प्राजक्ताने एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल भाष्य केले आहे.

नुकतंच प्राजक्ताने ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिला रॅपिड फायर राऊंडदरम्यान विविध प्रश्न विचारण्यात आले. तुला कोणासाठी सीसीटीव्ही व्हायला आवडेल किंवा कोणावर हेरगिरी करायला आवडेल, असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला.
आणखी वाचा : “वैभव तत्त्ववादी माझा…” प्राजक्ता माळीने उघड केले मोठे गुपित

त्यावर तिने असं खरंतर करायला नाही पाहिजे, असे म्हटले. त्यानंतर तिने “मला अभिनेत्री आलिया भट्टचं आयुष्य जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ती खूप परफेक्ट आहे. ती इतकी परफेक्ट कशी काय? हेच मला जाणून घ्यायचं आहे.”

“ती करिअरच्या बाबतीत, वैयक्तिक आयुष्य, कुटुंब सांभाळणं, मित्र-मैत्रिणींबरोबर फिरणं, त्यांच्या लग्नाला वैगरे जाणं यांसह अनेक गोष्टींचा ती फार उत्तमरित्या समतोल साधते. मला ते फार आवडतं.

अनेकदा आपण काम एके काम एके असं आपलं होतं. मग आपण वैयक्तिक आयुष्याकडे पाहत नाही. त्यामुळे आपण कंटाळतो. आता तर आई देखील झाली आहे. तिने तिच्या आयुष्यात फार बोल्ड निर्णय घेतले आहेत. मला ती फार आवडते”, असे प्राजक्ता माळी म्हणाली.

आणखी वाचा : “मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्राजक्ता माळी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. तिने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिने निवडलेल्या भूमिकांचे कायमच कौतुक होताना दिसते. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.