मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेला ओळखले जाते. अनेक मालिका आणि चित्रपटांमुळे ती घराघरात पोहोचली. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. प्रार्थना ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. नुकतंच प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

प्रार्थना बेहरेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ ती निळ्या रंगाच्या एका बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे. यावेळी तिचा नो मेकअप लूक पाहायला मिळत आहे. याबरोबरच तिने केस मोकळे सोडले आहेत. यात तिच्या हावभावाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “अंकिताबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत…” प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

प्रार्थनाचा हा व्हिडीओ आणि त्यातील तिचे हावभाव पाहून तिचे चाहते संतापले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. यात एक नेटकरी म्हणाला, “काय झालं? मळमळतंय का? (चुकून Sound mute असताना बघितला गेला व्हिडिओ).” तर एकाने ही “अंकिता लोखंडेला कॉपी करतेय का?” असे कमेंट करत म्हटले आहे.

तर एका नेटकऱ्याने “Durex ची नवी जाहिरात वाटली मला आधी”, असे म्हटले आहे. तर एकाने “Kamasutra condom ची जाहिरात आहे का?” असा प्रश्न विचारला आहे. तर एकाने “मान अकडली वाटतंय” असं म्हणत प्रार्थनाची खिल्लीही उडवली आहे. प्रार्थनाने यावर काहीही उत्तर दिलेले नाही.

आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सध्या प्रार्थना ही झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची देखील अधिक पसंती मिळत आहे. प्रार्थनाचा या मालिकेमधील लूक आणि तिची भूमिका प्रेक्षकांना खरं तर आपल्यापैकीच एक वाटत आहेत. या मालिकेतील तिच्या भूमिकेला आणि मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहे.