सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी नवख्या कलाकारांना खूप संघर्ष करावा लागतो. बऱ्याचदा काहींना कास्टिंग काऊचसारख्या धक्कादायक प्रकाराचा सामनाही करावा लागतो. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री आहे, जिने हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. या अभिनेत्रीला २० व्या वर्षी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. तिने एका मुलाखतीत तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला होता.

‘पिशाच्नी’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री रुतुजा सावंत हिने आजवर अनेक शोमध्ये काम केलं आहे. तिने कास्टिंग काऊचचा तो प्रसंग आणि तिथून ती कशी निसटली होती, याबाबत सांगितलं. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, रुतुजाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की करिअरच्या सुरुवातीला तिला वयाच्या २० व्या वर्षी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.

Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती
mohena kumari welcomes baby girl
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न
narayani shastri husband
“त्याने माझ्या सर्व एक्स बॉयफ्रेंड्सना…”, प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबाबत खुलासा; म्हणाली, “आमचं ब्रेकअप झालं तरी…”

शरीराने एकमेकींशी जोडलेल्या बहिणी अडकल्या लग्नबंधनात, पतीबरोबरचे फोटो आले समोर

“संघर्ष करणाऱ्या कलाकारासाठी ऑडिशन देणं खूप सामान्य गोष्ट आहे. काम मिळवण्यासाठी खूप ऑडिशन्स द्याव्या लागतात. मी २० वर्षांचे होतो तेव्हा कामाच्या शोधात होते. एके दिवशी मला एका एजंटचा फोन आला आणि त्याने मला त्याच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बोलावलं. मी त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यावर मला कामाबद्दल सांगण्याऐवजी तो माझ्या जवळ येऊ लागला. त्याने मला जोरात त्याच्याकडे ओढलं. यामुळे मी खूप घाबरले आणि कशीतरी तिथून पळून गेले,” असं रुतुजा मुलाखतीत म्हणाली.

Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ

“या घटनेतून मला शिकायला मिळालं की अनोळखी लोकांना भेटताना खूप सावध राहा, काळजी घ्या. मी त्या दिवसापासून एकटी कोणत्याही मीटिंगला गेलेली नाही. मी नेहमी माझ्या मित्र किंवा मैत्रिणीला बरोबर न्यायचे. आजही मी जेव्हा कधी कामानिमित्त कोणाला भेटायला जाते तेव्हा ती व्यक्ती कोण आहे, याबाबत जाणून घेते,” असं रुतुजा म्हणाली.

घटस्फोटानंतर २४ वर्षांनी शेफाली शाहचा पहिला पती म्हणाला, “आम्ही कधी एकमेकांसमोर आलो तर…”

“नवीन कलाकारांना अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं हे खूप दुर्दैवी आहे. पण जगात चांगले आणि वाईट दोन्ही लोक राहतात. आपण फक्त स्वत: ला सुरक्षित ठेवलं पाहिजे,” असं रुतुजा म्हणाली होती. कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘मेहंदी है रचनेवाली’ आणि ‘छोटी सरदारनी’ मध्ये काम केलं होतं.