मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकरचं नाव कायमच घेतलं जातं. फक्त मराठी नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही तिने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सई ताम्हणकर नुकतंच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना फोन लावला.

झी मराठीने नुकतंच या कार्यक्रमातील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या कार्यक्रमावेळी सई ताम्हणकरने मराठी चित्रपट बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला फोन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी तिने भावुक शब्दात संवाद साधला.
आणखी वाचा : “स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचं यश…” सई ताम्हणकरचा सिनेसृष्टीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली “समान वेतन लांब…”

“हाय कसा आहेस, सगळ्यात आधी खूप धन्यवाद, आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल, सदिच्छांबद्दल आणि मला सर्वस्वी स्वीकारुन मी जिथपर्यंत पोहोचली आहे तिथपर्यंत पोहोचवण्याबद्दल. पण गेली दोन-चार वर्ष मला असं वाटतंय की तू रुसलास बाबा… काय कारण आहे.

मला माहितीये की आता तुझे नवीन मित्र झालेत, एकदम नवखे मित्र आहेत. त्यांच्याबरोबर तू जास्त असतोस. पण म्हणून मग तू जुन्या मित्रांना विसरणार आहेस का? तुही मला आज एक वचन दे, तू तुझा रुसवा-फुगवा विसरुन तू पुन्हा येशील”, असे सई यावेळी म्हणाली.

आणखी वाचा : “तिसऱ्या पत्नीने ठेवलेला आईशी लग्नाचा प्रस्ताव पण…”, राहुल महाजनने सांगितलेला नताल्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सईने साधलेला हा संवाद ऐकून प्रेक्षक भावूक झाले. सईच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. यात तिने व्यक्त केलेल्या संवादाचे अनेकांनी कौतुक केले. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.